Fertilizer Management : शाश्वत पद्धतीने रब्बी पिकामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकाचे उत्पादन चांगले मिळण्यासाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये उपलब्ध करावी लागतात. दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्ये किंवा खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी त्या सोबत सेंद्रिय व जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असते.
 Fertilizer Management
Fertilizer Management Agrowon


डॉ. अशोक डंबाळे

पिकाचे उत्पादन चांगले मिळण्यासाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये (Crop Nutrients) उपलब्ध करावी लागतात. दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्ये किंवा खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केवळ रासायनिक खतांवर (Chemical Fertilizer) अवलंबून राहण्याऐवजी त्या सोबत सेंद्रिय व जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असते. प्रत्येक पिकासाठी कृषी शास्त्रज्ञांनी खताची एक शिफारस दिलेली असते.

आपण लागवड करत असलेल्या सर्व पिकांच्या शिफारशी आपण माहीत करून घ्याव्यात. या शिफारशीप्रमाणे खते देणे गरजेचे असते. अर्थात, जमिनीचा प्रकार, त्याची सुपीकता, उपलब्ध अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, हवामान, ओलित आणि जिरायती पीक पद्धती, पिकांचे प्रकार, त्यांच्या जाती आणि त्यांना लागणारे अन्नद्रव्याचे प्रमाण त्यानुसार काही बदल करावे लागतात. हेही समजून घ्यावेत.

 Fertilizer Management
एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन

अधिक पीक उत्पादनासाठी जमिनीतून अन्नद्रव्याची उचल मुळांकडून योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. त्यासाठी वाढीसाठी आवश्यक त्या अन्नद्रव्याचा समतोल साधला पाहिजे. त्याच प्रमाणे जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा एकत्रित वापर करून अन्नद्रव्यांची पूर्तता केली पाहिजे. याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटले जाते. एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यास पिकांच्या व जमिनीच्या आरोग्यासाठी असे व्यवस्थापन अति आवश्यक असते.

सेंद्रिय खते (शेणखत किंवा कंपोस्ट)
उष्ण कटिबंधीय हवामान पट्ट्यामध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते म्हणून जिरायती किंवा ओलित पिकासाठी शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीतून उपलब्ध करून द्यावे.

 Fertilizer Management
Organic Fertilizer : अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची...

रब्बी ज्वारी आणि गहू बागायती पद्धतीने घेताना सुमारे ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत समप्रमाणात मिसळून द्यावे.
करडई व सूर्यफूल पिकासाठी सेंद्रिय खतांची मात्रा ३ ते ५ टन नांगरटीवेळी जमिनीतून द्यावी.
जवस, मोहरी, हरभरा आणि वाटाणा पिकासाठी उपलब्धतेनुसार नांगरटीच्या वेळी जमिनीतून शेणखत किंवा कंपोस्ट खत उपलब्ध करून द्यावे.

 Fertilizer Management
Soil Management : जमिनीचे शाश्वत व्यवस्थापन

जैविक किंवा जिवाणू खते
ज्वारी व गहू ही तृणधान्य वर्गीय पिके असून वातावरणातील मुक्त नत्राचे स्थिरीकरण असहयोगी पद्धतीने करण्यासाठी अॅझेटोबॅक्टर या सूक्ष्म जिवाणूंची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. यासाठी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणू खतांचा वापर करावा.
कडधान्य पिकासाठी (हरभरा आणि वाटाणा) रायझोबियम सूक्ष्मजीवाणूयुक्त जैविक खतांची बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते.
तृणधान्ये, कडधान्य आणि तेलबियांची स्फुरदाची गरज भागवण्यासाठी स्फुरद विद्राव्य जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
या दोन्ही प्रकारच्या जिवाणू खतांचा वापर केल्यास पिकांना अधिक प्रमाणात नत्र आणि स्फुरद उपलब्ध होते.

रासायनिक खते

रासायनिक खतामध्ये प्रमुख अन्नद्रव्ये ही नत्र, स्फुरद व पालाश ही आहेत. त्यांचा वापर सेंद्रिय खतासोबत केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

जिरायती ज्वारी आणि गहू
नत्र, स्फुरद आणि पालाश ची मात्रा हेक्टरी ४० : ४० : २० म्हणजेच ८६ किलो युरिया १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावी.

 Fertilizer Management
Fertilizer Management : डाळिंब बागेत बायोमिनरल खतांचा संतुलित वापर

बागायती रब्बी ज्वारी
नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा हेक्टरी ८० : ४० : ४० द्यावी लागते. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि नत्राची अर्धी मात्रा ८७ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावी. नत्राची उर्वरित ८७ किलो प्रति

हेक्टरी मात्रा सुमारे २१ ते २५ दिवसांनी संकरित ज्वारीची मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत द्यावी.

बागायती गहू
रासायनिक खतांची मात्रा हेक्टरी १०० : ५० : ५० शिफारशीत अशी आहे. त्यातील नत्राची अर्धी मात्रा (१०८ किलो युरिया ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीच्या वेळी जमिनीतून मिसळून द्यावी. उर्वरित नत्र (१०८ किलो युरिया) २१ दिवसांनी मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत गहू पिकाच्या ओळीमधून द्यावा.

करडई आणि रब्बी सूर्यफूल ः
नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा करडईसाठी हेक्टरी ६०: ३०:३० व सूर्यफुलासाठी हेक्टरी ६० : ४० : ३० अशी शिफारस आहे. करडईसाठी १३१ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळीच जमिनीतून मिसळून द्यावे. मात्र रब्बी सूर्यफुलासाठी नत्राची अर्धी मात्रा (६५ किलो युरिया) पेरणीच्या वेळी व उर्वरित अर्धी मात्रा ३० दिवसांनी ओळी मधून द्यावी. स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा (१८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळीच जमिनीतून द्यावी.

जवस आणि मोहरी ः
या तेलबिया पिकांना अनुक्रमे २५ : २५ : ०० आणि ५०: २५ : ०० अशा हेक्‍टरी मात्रा द्याव्या लागतात. त्यासाठी जवस पिकास ५४ किलो युरिया आणि १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी जमिनीतून मिसळून द्यावे. तसेच मोहरीच्या पिकास १०९ किलो युरिया आणि १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी जमिनीतून दिले पाहिजे.

हरभरा आणि वाटाणा
या पिकासाठी २५ : ५० :०० अशी हेक्‍टरी रासायनिक खतांची मात्रा शिफारशीत केलेली आहे. ५४ किलो युरिया आणि ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ही खते पेरणीच्या वेळी जमिनीतून मिसळून द्यावीत.


रब्बी पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
पीक --- सेंद्रिय खत (शेणखत / कंपोस्ट) प्रतिहेक्टरी --- जैविक खत (२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास) --- रासायनिक खते (किलो) प्रतिहेक्टरी
०० --- ०० --- ०० --- प्रमुख (नत्र, स्फुरद ,पालाश) --- दुय्यम (गंधक) --- सूक्ष्म
जिरायती ज्वारी --- ३ ते ५ --- अॅझेटोबॅक्टर आणि पीएसबी --- ४० : ४० :२० --- ० --- ०
जिरायती गहू --- ३ ते ५ --- ४० : ४० :२० ---० --- ०
बागायती ज्वारी --- ८ ते १० --- ८० :४० :४० --- २० कि. --- २० किलो झिंक सल्फेट
बागायती गहू --- ८ ते १० --- ८० :४० :४० --- २० कि. --- २० किलो झिंक सल्फेट
करडई --- ३ ते ५ --- अॅझेटोबॅक्टर आणि पीएसबी --- ६० : ३० : ३० --- २० कि. --- २० किलो झिंक सल्फेट
सूर्यफूल --- ८ ते १० --- ६० : ४० : ३० --- २० कि. --- ५ किलो बोरॅक्स
मोहरी --- ३ ते ५ --- ५० : २५ : ०० --- २० कि. --- ५ किलो बोरॅक्स
जवस --- ३ ते ५ --- २५ : २५ :०० --- २० कि. --- ०
हरभरा --- ३ ते ५ --- रायझोबियम आणि पीएसबी --- २५ :५० :०० --- २० कि. --- २० किलो झिंक सल्फेट
वाटाणा --- ३ ते ५ --- २५ :५० :०० --- २० कि. --- ५ किलो बोरॅक्स
--------------
डॉ. अशोक सं. डंबाळे, ८७८८०२७४७४
(सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, सेलू.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com