Sharad Pawar : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उद्या आटपाडीमध्ये

शेतकऱ्यांच्या अभ्यास मेळाव्याचे आयोजन
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

आटपाडी, जि. सांगली : टेंभूचे बंदिस्त पाइपने मोजून पाणी देणारी आणि त्याअनुषंगाने पिके घेण्याची यंत्रणा उभी करण्यासाठी आणि योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. २७) शेतकऱ्यांच्या अभ्यास मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (Dr, Bharat Patankar) आणि आनंदराव पाटील (Anandrao Patil) यांनी दिली.

या शेतकरी अभ्यास मेळाव्याचे उद्‌घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. डॉ. पाटणकर यांनी टेंभूचे पाणी, बंदिस्त पाइपलाइनची झालेली कामे आणि शिल्लक राहिलेली कामे आणि शेतकऱ्यांची जनजागृतीची आवश्यकता याचा आढावा मांडला.

Sharad Pawar
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

पाटणकर म्हणाले, की मे २०२३ पर्यंत टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत मोजून देणारी यंत्रणा उभी करावी अशी आमची आग्रही मागणी आहे. दिले जाणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक, पाणी मोजून घेऊन पाहिजे ती पिके घेण्याची यंत्रणा उभी करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना सुरू करण्याची गरज आहे. पाणी येईल पण शेतकऱ्यात त्या दृष्टीने जनजागृती आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी या शेतकरी अभ्यास मेळाव्याचे आयोजन केले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला समन्वय पाणीवाटप पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत समान पाणीवाटप करणारा जगातील हा पहिला उपक्रम आहे. मात्र याची अंमलबजावणीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक गावागावांतील प्रत्येक शेतकरी लाभधारक सहभागी झाला नाही, तर संपूर्ण यंत्रणा लवकर सुरू होणार नाही.

शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनमधून किती दिवसांनी आणि कसे पाणी देणार याची प्रशिक्षणातून माहिती न दिल्यास बंद पाइपलाइन योजनेत अनेक दोष राहतील. ते दोष राहू नये यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात गुरुवार ता. २७ ऑक्टोबर रोजी भिंगेवाडीत शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा घेऊन केली जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com