Mushroom Farming : ‘प्रशिक्षण ते विक्री’ चा ‘एफपीओ’ आधारित अळिंबी विस्तार कार्यक्रम झाला यशस्वी

कृषी तंत्रज्ञानाच्या विस्तारामध्ये पारंपरिक विस्तार प्रारूपाच्या तुलनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा संस्थांच्या (एफपीओ) माध्यमातून राबविलेले विस्ताराचे कार्यक्रम अधिक कार्यक्षम ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने त्याचा वापर ‘अळिंबी उत्पादन ते विपणन’ या विस्तार कार्यक्रमामध्ये केला होता.

वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या वतीने अळिंबी उत्पादनाला (Mushroom Production) चालना देण्यासाठी एक विस्तार कार्यक्रम आखण्यात आला होता. या विस्तार कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्ट २०२१ च्या अखेरच्या आठवड्यामध्ये झाली होती. या वेळी पोषण सुरक्षितता आणि महिला सबलीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने तीन दिवसांचे रहिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला.

Mushroom Farming : ‘प्रशिक्षण ते विक्री’ चा ‘एफपीओ’ आधारित अळिंबी विस्तार कार्यक्रम झाला यशस्वी
Mushroom Farming : धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान

त्यामध्ये २० शेतकरी महिलांनी सहभाग घेतला. त्यातील १० महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्य होत्या, तर उर्वरित दहा महिला कोणत्याही एफपीओशी संबंधित नव्हत्या. सर्वांना एकाच वेळी एकाच प्रकारे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. या प्रशिक्षणानंतर महिलांना त्यांनी अळिंबीचे उत्पादन घेण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्यात आले.

Mushroom Farming : ‘प्रशिक्षण ते विक्री’ चा ‘एफपीओ’ आधारित अळिंबी विस्तार कार्यक्रम झाला यशस्वी
Mushroom Farming : उत्तराखंडची मशरूमची शेती पाहिलीय का?

त्यासाठी पिशव्या आणि बियाणे इ. आवश्यक बाबीही पुरवण्यात आल्या. एक महिन्यानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्यांची प्रगती पाहण्यासाठी या प्रकल्पांना भेट दिली. त्यांच्या पाहणीमध्ये अनेक महिलांनी अळिंबीच्या पिशव्यांच्या व्यवस्थित निगा राखली नसल्याचे दिसून आले.

Mushroom Farming : ‘प्रशिक्षण ते विक्री’ चा ‘एफपीओ’ आधारित अळिंबी विस्तार कार्यक्रम झाला यशस्वी
Mushroom: अळिंबीचं उत्पादन कसं घ्यावं ? | ॲग्रोवन

या पिशव्यांमध्ये अनावश्यक आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या बुरशीची (Coprinus) वाढ झाल्याचे दिसून आले. त्यावरून चर्चा झाली. शास्त्रज्ञ बऱ्यापैकी नाराज झाले. दुसऱ्या दिवशी शेतकरी उत्पादक संस्थेशी संबंधित तीन महिला स्वतःहून संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञांना भेटायला आल्या. त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही प्रशिक्षण घेऊन गेलो असलो तरी व्यवस्थापनाशी संबंधित बारकावे आणि अनेक बाबी विसरून गेलो.

त्यामुळे पहिल्यांदा भरलेल्या पिशव्यामध्ये बुरशीची वाढ झाली.’’ सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे प्रशिक्षण घेण्याची विनंती केली. यामागे शेतकरी उत्पादक संस्था म्हणून या महिलांचे एकमेकांवर सातत्याने लक्ष आणि एक प्रकारचा दबाव महत्त्वाचा ठरला. त्यातून अधिक चांगले करण्याचे एक प्रेरणात्मक प्रोत्साहन मिळत राहिले. दुसऱ्या बाजूला ज्या महिला शेतकरी उत्पादक संस्थेशी संबंधित नव्हत्या, त्या विचारण्यासाठीही पुन्हा परत आल्या नाहीत.

ज्या महिला प्रशिक्षण करण्यासाठी इच्छुक होत्या, त्यातील निवडक १० महिलांसाठी एक दिवसाची कार्यशाळा पुन्हा घेण्यात आली. त्यात व्यवस्थापनातील बारकावे पुन्हा समजाविण्यात आले. एक महिन्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये शास्त्रज्ञांच्या गटाने या महिलांच्या अळिंबी उत्पादन केंद्रांनी भेटी दिल्या. आता या महिलांना अत्यंत कार्यक्षमपणे व्यवस्थापन केले होते. या महिलांचे दुधी धिंगरी (मिल्की ओयस्टर) अळिंबी उत्पादनही लक्षणीय चांगले मिळाले.

मात्र ही दुधी धिंगरी अळिंबी बाजारामध्ये तितकीशी लोकप्रिय नाही आणि तिला मागणीही तुलनेने कमी असते. सर्व महिलांचे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यामुळे त्यांच्या विक्री कशी होणार, ही भीती महिलांना भेडसावू लागली. अर्थात, कोणतेही उत्पादन करण्याइतकेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक अवघड उत्पादनाची विक्री करणे असते.

या अळिंबी उत्पादनाची विक्री न झाल्यास किंवा त्याला दर कमी मिळाल्यास संपूर्ण प्रकल्पच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा भाजीपाला संशोधन केंद्राने या अळिंबीची विक्री करण्याचा विचार पुढे आला. सातत्याने या विषयावर चर्चा होत असल्यामुळे संशोधन संस्थेतील बहुतांश सर्व कर्मचाऱ्यांना अळिंबीतील पोषकता आणि आरोग्यासाठीचे फायदे माहिती होते.

त्यामुळे फारसे काही मार्केटिंग न करताही या महिलांची अळिंबी बऱ्यापैकी विकली गेली. त्याला प्रति किलो १०० रुपये असा दरही मिळाला. त्यानंतर या महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना आजूबाजूच्या बॅंका, पोस्ट ऑफिस, शाळा आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विक्री सुरू केली. साऱ्या सरकारी कार्यालये व संस्थांमधून अळिंबी विक्रीचे एक चांगले प्रारूप या महिलांनी तयार केले.

मूल्यवर्धनामुळे विक्रीला मिळाली चालना

१) दरम्यानच्या काळामध्ये या महिलांमधून एक उद्योजकाने मिल्की ओयस्टर अळिंबीपासून लोणचे, चटणी, पावडर असे मूल्यवर्धित पदार्थही तयार केले. त्याच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला. त्याने या महिला गटाकडून मोठ्या प्रमाणात अळिंबीची खरेदी सुरू केली. त्यामुळे महिलांवरील विक्रीचा ताणही बऱ्यापैकी कमी झाला. ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या पाच महिन्यांच्या काळामध्ये १६ महिलांच्या या गटाला २५,३०० रुपये मिळाले. त्यातून त्यांचा हुरूप वाढला.

२) सामान्यतः कोणत्याही प्रशिक्षणानंतर पुढील व्यवसाय उभारण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. त्याशिवाय त्या प्रशिक्षणाला काही अर्थ राहत नाही. या विचाराने पाहिल्यास शेतकरी उत्पादक संस्थेशी संबंधित महिलांसाठी घेतलेले प्रशिक्षण अधिक कार्यक्षम ठरल्याचे स्पष्ट झाले. गटाने एकत्रित असलेल्या महिलांमध्ये एकीमुळे धाडस, प्रेरणा आणि एकमेकींना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती यामुळे कोणताही विस्तार कार्यक्रम उत्तम प्रकारे राबवला जाऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com