घर पाहावे बांधून...

‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आयुष्यात प्रत्येकाला घर बांधावे लागते लग्न करावे लागते.
Home
Home Agrowon

शंकर बहिरट

‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आयुष्यात प्रत्येकाला घर बांधावे लागते लग्न करावे लागते. मुलगा मुलगी वयात आले की त्यांचे दोनाचे चार हात करणे हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य असते. आई-वडील आपल्या उपवर झालेल्या मुलामुलींसाठी चांगले स्थळ शोधत असतात. स्थळ म्हणजे फक्त ठिकाण नव्हे. त्यात अनेक गोष्टी येतात.

Home
Wheat Sowing : गहू पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

असे स्थळ जे आपल्याला अनुकूल आणि अनुरूप असावे. वधू आणि वराची परीक्षा करताना त्यांचे वय, व्यक्तिमत्त्व, शिक्षण आणि व्यवसाय इत्यादी बघितले जातातच शिवाय त्यांची वर्तणूक कशी आहे, याची आजूबाजूला खात्रीच्या माणसाकडे चौकशी केली जाते. ज्यात महत्त्वाचा प्रश्‍न असतो तो म्हणजे घर कसे आहे? यांत अनेक उप प्रश्‍न दडलेले असतात जसे की घराचे संस्कार कसे आहेत? घरातल्या सदस्यांची वर्तणूक कशी आहे?

एक सुंदर कविता आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा, प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घर पाहावे बांधून आणि लग्न पहावे करून या दोन क्रिया आयुष्यात जितक्या महत्त्वाच्या आहेत त्या वेगवेगळ्या क्रिया दिसत असल्या, तरी तितक्याच त्या एकमेकांशी निगडित आहेत. चांगले घर बांधायचे म्हणजे कुशल गवंडी असावा लागतो. घरातला कर्ता पुरुषसुद्धा कुशल गवंड्याप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि जिव्हाळ्याने बांधून ठेवत असतो.

त्या घराला आणखी मजबूत करण्यासाठी झटत असतो. घरात येणारी नववधू ही एक सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी वीट असते. ती वीट आयुष्यभरासाठी त्या घराला मजबूत ठेवते. हिंदीमध्ये विवाह करण्याला ‘घर बसाना’ असे म्हटले जाते जे अतिशय समर्पक आहे. घर बांधताना जशी घराची प्रत्येक वीट महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते.

घर बांधायचे म्हणजे कुशलतेने वधू-वर संशोधन होणे हे महत्त्वाचे असते. मुलीच्या आईवडिलांची अपेक्षा असते की आपली मुलगी चांगल्या घरात द्यावी. मुलगा लग्नाला आला म्हणजे आपले चांगले घर असावे. नसेल तर नवीन बांधावे यासाठी आधीच नियोजन करावे लागते.

आपल्या पूर्वजांनी विवाह पद्धती सुरू केली त्याचा सकारात्मक फायदा असा की आयुष्यात आपल्याला चांगला जोडीदार मिळावा, आपल्याला चांगली सून मिळावी किंवा चांगला जावई मिळावा, या हेतूने प्रत्येक व्यक्ती आपले घर समाजात जास्तीत जास्त कसे सुंदर, संस्कारी आणि प्रगतिशील दिसेल यासाठी प्रयत्नशील असतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com