Fertilizer Brickets : पिकांना खते द्या ब्रिकेट्स स्वरुपात

कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून विविध प्रकारच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
Organic fertilizers
Organic fertilizersAgrowon

कोकणामध्ये खरीप हंगामात (Kharip Season) प्रामुख्याने भात, नागली व वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील जमिनीमध्ये पाण्याचा निचरा त्वरित होत असल्याने पिकांना दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्यांचा पाण्यामार्फत ऱ्हास होतो. त्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे (Paddy Crop) उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सचा वापर करण्याची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा (Brickets) वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. तसेच खतांच्या मात्रेमध्ये बचत झाल्याचे आढळून आले. युरीयासोबत (Urea) इतर मिश्र खतांचे विशिष्ट गुणोत्तर वापरून क्रांती ब्रिकेटर यंत्रामध्ये तयार केलेल्या गोळ्या म्हणजेच ‘खतांच्या ब्रिकेट्‍स’ (Fertolizer Brickets) होय. कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून विविध प्रकारच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.  

Organic fertilizers
Organic Fertilizers : जीवाणू संवर्धन वापरतांना काय काळजी घ्याल? | ॲग्रोवन

ब्रिकेट्चे प्रकार : अन्नद्रव्यांचे प्रमाण (%)

युरिया – डीएपी ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) : ३४:१४:१८

युरिया – सुफला ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश)    : ३४:१७:००

युरिया – १०:२६:२६ ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) : २१.५:२२:२४

कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) : ३४:१४:०६

सिलिकॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र : स्फुरद: पालाश: सिलिका) : ३४:१४:०६:०.४४

बोरॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश: बोरॉन) : ३४:१४:०६:०.२२

Organic fertilizers
Fertilizer Management : विद्राव्य खतांची ओळख अन् कार्ये

फायदे काय आहेत. 

- अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. 

- अन्नद्रव्यांची उपयुक्तता २० ते २५ टक्क्यांनी वाढते.

- खतांच्या मात्रेमध्ये बचत होते.

- खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

- पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये भरीव वाढ मिळते.

- मजुरी खर्चात बचत होते.

ब्रिकेट्स वापरताना घ्यावयाची काळजी 

भाजीपाला पिके लागवडीनंतर ८ दिवसांनी ब्रिकेट्सचा वापर करावा.

पीकनिहाय ब्रिकेट्सची एकूण संख्या, पिकांच्या वाढीच्या कालावधीत विभागून द्यावीत.

ब्रिकेट्स जमिनीमध्ये ५ ते ७ सेंमी खोल खोचावीत.

भाजीपाला व कडधान्य पिकांमध्ये मुळापासून ७ ते १० सेंमी लांब अंतरावर ब्रिकेट्स द्यावीत.

ब्रिकेट्सची मात्रा सेंद्रिय खतांसोबत (शेणखत/गांडूळखत/ कोंबडी खत) द्यावी.

ब्रिकेट्स दिल्यानंतर लगेच सिंचन द्यावे. कारण जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.

रब्बी पिकांना ठिबक सिंचनाच्या पाण्यामार्फत ब्रिकट्‍स वापर केल्यास अधिक फायदा होतो.

वापर झाल्यानंतर शिल्लक ब्रिकेट्‍स सीलबंद पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवाव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com