Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य वाण

कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फुलपीक आहे. जगभरात या फुलपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
 Gladiolus Cultivation
Gladiolus CultivationAgrowon

कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस (Gladiolus Cultivation) हे एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फुलपीक (Flower Crop) आहे. जगभरात या फुलपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. भारतामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, बंगळूर आणि पुणे या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. ग्लॅडिओलस फुलांना बाजारात चांगले दर मिळत असल्याने दिवसेंदिवस याचे लागवड क्षेत्र वाढत आहे.

 Gladiolus Cultivation
Chana Cultivation : हरभरा लागवडीचे सुधारित तंत्र

कडक उन्हाळा आणि सततचा जोरदार पाऊस हा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख मानले जातात.

सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पीक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने बाजारभाव देखील चांगले मिळतात.

वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करून संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने केल्यास फुलांना चांगला बाजारभाव मिळू शकतो.

 Gladiolus Cultivation
Linseed Cultivation : जवस लागवडीसाठी वापरा सुधारित जाती

ध्यम ते भारी प्रतीची, परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.

किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातीची निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदाची निवड करावी. लागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवावेत. लागवडीसाठी ४ सेंमी किंवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.

सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत ३० सेंमी व दोन कंदांत १५ ते २० सेंमी अंतर ठेवावे.

लागवडीसाठी सरी वरंबे पद्धती फायदेशीर ठरते. कारण या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य निचरा होतो, लागवडीनंतर पिकांमध्ये कामे करणे सुलभ होते, तसेच फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने लागवड करताना दोन सरींत ४० ते ४५ सेंमी व दोन कंदांत १० ते १५ सेंमी अंतर ठेवावे. हेक्टरी साधारण सव्वा लाख ते दीड लाख कंद पुरेसे होतात.

व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम प्रतीच्या जातीच्या निकषांमध्ये फुलांचा आकर्षक रंग, फुलदांड्यावरील एकूण फुलांची संख्या कमीत कमी चौदा असावी. निवडलेल्या जातीची कीड व रोग प्रतिकारक आणि उत्पादनक्षमता चांगली असावी. विशेषतः लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील हवामानात चांगली येणारी असावी. लागवडीसाठी संसरे, यलोस्टोन, ट्रॉपीकसी, फुले गणेश, फुले प्रेरणा, सुचित्रा, नजराना, पुसा सुहागन, लाल हन्टिंग साँग, केशरी या जातींची निवड करावी. 

लागवडीपूर्वी हेक्टरी ८० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. माती परीक्षणानुसार ३०० किलो, नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाशची मात्रा द्यावी.

लागवडीवेळी पालाश आणि स्फुरदची संपूर्ण मात्रा द्यावी. तर नत्र तीन समान हप्त्यांमध्ये विभागून लागवडीनंतर ३,५ व ७ आठवड्यांनी (अनुक्रमे २,४ आणि ६ पाने आल्यानंतर) द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com