गोव्याची समृद्धी जंगल, जैवविविधतेतही...

राज्याचे भौगोलिक क्षेत्र मर्यादित, त्यातही राखीव जंगलाचा हिस्सा मोठा अशा राज्यांमध्ये वातावरण बदलाचा प्रभाव नेहमीच कमी जाणवतो.
Goa
GoaAgrowon

राज्याचे भौगोलिक क्षेत्र मर्यादित, त्यातही राखीव जंगलाचा हिस्सा मोठा अशा राज्यांमध्ये वातावरण बदलाचा प्रभाव नेहमीच कमी जाणवतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोवा. लगतच्याच कोकण भागात चक्रीवादळे, छोट्या नद्यांना आलेले महापूर, वाहून गेलेली गावे, शेती आपल्याला दिसत असताना त्या तुलनेत गोव्यात चक्रीवादळांचा प्रभाव कमी जाणवतो. विशेष म्हणजे दोन्ही भागांना जोडलेला आहे तो अरबी समुद्रच!

गोवा (Goa) हे दक्षिण पश्‍चिम समुद्र किनाऱ्यालगतचे छोटेसे राज्य. आपल्या कोकण विभागालगत येणारे, मात्र भौगोलिक नकाशानुसार डेक्कनचे पठार आणि पश्चिम घाटामुळे ते विभक्त झाले आहे. हे राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या (Karnataka) सीमांना उत्तर दक्षिण असे जोडलेले आहे. भारतामधील श्रीमंत राज्यांपेकी एक म्हणून त्याची ओळख. ती केवळ पैशासंदर्भातच नव्हे, तर जंगल आणि जैवविविधता समृद्धीसाठीही. या राज्याचा जीडीपी उर्वरित भारतामधील राज्यापेक्षा तब्बल अडीच पट जास्त आहे. गोव्यामधील नागरिकांचे नागरी जीवन शेतकऱ्यांबरोबरच (Farmer) इतर स्थानिक गोवेकरासह उच्च दर्जाचे आहे. राष्ट्रीय लोकसंख्या (National People) मंडळाने नागरिकांचे गुणवत्तापूर्वक जीवन प्रणालीसाठी एकूण बारा मापदंड दिले आहेत. गोवा हे सर्व मापदंड पूर्ण करते. वातावरण बदलाच्या प्रभावाखालीसुद्धा या राज्यामधील नागरिक, शेतकरी आनंदी दिसतात.

Goa
प्रतिदिन पंचवीस टन मासळी गोवा, केरळकडे 

अर्थात, या मागील अन्य कारणांची मीमांसा आपण करणार आहोत. त्यातील एका मुद्द्याचा ओझरता उल्लेख येथे अवश्य करावा लागेल, तो म्हणजे स्थलांतर. वातावरण बदलामुळे पुढील काही दशकांमध्ये जागतिक (Global) पातळीवर नागरिक, शेतमजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. विशेषत: समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या शहरांमध्ये या स्थलांतराचा प्रभाव जास्त जाणवणार आहे. तसेच सर्वाधिक प्रभाव या लोकसंख्येस समावून घेणाऱ्या अन्य शहरांवरही होणार आहे.
आपल्या राज्यातील कोकण विभागामध्ये समुद्र किनाऱ्यालगतची भात शेती (Rice Farm) जवळपास लयाला गेली असल्याचे स्पष्ट होते. जमिनी खारट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती सोडून मुंबईसारख्या (Mumbai) महानगरीमध्ये स्थलांतर करावे लागले आहे. मात्र गोव्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. कारण पर्यटन. दोन्हीकडे अरबी समुद्रच (Arabi Sea) आहे. कोकणामधील अनेक समुद्र किनारे सुंदर असूनही पर्यटनासाठी आजही दुर्लक्षित आहेत, तर गोव्यामधील आठ समुद्रकिनारे आणि तेथील रुपेरी वाळूने या राज्याला श्रीमंत केले आहे. भारतातील राज्यनिहाय पर्यटनाचा आलेख काढल्यास गोवा प्रथम स्थानावर येते ते याचमुळे. विस्तीर्ण स्वच्छ समुद्र किनारे, काठावरील नारळ (Coconut), पोफळीच्या बागा आणि त्या पलीकडे असलेली भात शेती (Rice Farmer) हे निसर्गाचे रूप पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक येथे गर्दी करतात. गोव्याचा मानवी विकास मापदंड (Human Development Index) सर्वांत जास्त आहे तो याचमुळे.

Goa
शेत जमिनी गेल्या पाण्याखाली

गोव्याची पूर्वीची ओळख पोर्तुगीज इंडिया (Goa was formerly known as Portuguese India) अशीच होती. पोर्तुगालमधील काही व्यापारी ४५० वर्षांपूर्वी मडगावला व्यापारासाठी आले. त्यांनी येथेच बस्तान बसवले. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना गोव्यात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सोबत दीव दमणही घेतले. भारत (India) स्वतंत्र झाल्यानंतर दीर्घकाळाने म्हणजे १९६१ मध्ये गोवा दमण आणि दीव पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारताने परत घेतले. आजही या निसर्ग सुंदर राज्याबद्दल पोर्तुगीज लोकांच्या मनात खूप आदर आहे. जेथे निसर्ग सुंदर असतो, नद्यांचा सन्मान होतो, तेथे प्रत्येकाचेच मन रमते. गोवा स्वतंत्र झाल्यावर ते दीवदमणसह केंद्रशासित प्रदेश म्हणून गणले गेले. पुढे १९८७ मध्ये ते स्वतंत्र राज्य झाले. दमण दीव मात्र आजही केंद्रशासितच आहेत.

नद्यांची (River) श्रीमंती जपली...
गोव्याला १६० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. राज्यामधील सर्व सात नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. झुवारी, मांडवी, तेरेखोल या नद्यांची पात्रे विशाल तर आहेतच, पण त्यांची खोलीसुद्धा जास्त आहे. गोव्यामधील सर्व जलवाहतूक गंगा नदीप्रमाणे या नद्यांमधूनच होते. सर्वांत लहान नदी ‘साल’ ही आहे.

पण तिचाही सन्मान या राज्यात केला जातो. गोव्याची आजची आर्थिक भरभराट या सर्व नद्याबरोबर जोडलेली आहे. म्हणूनच गोव्याच्या आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जातात. पश्‍चिम घाटामधून उगम पावलेल्या या नद्या पृष्ठभागावर आल्यावरही तेवढ्याच स्वच्छ, शांत आणि प्रवाही आहेत. गोव्याचा ६९ टक्के भाग जलयुक्त आहे, ते या सर्व नद्या, ४० खाड्या, ९० नद्यांमधील लहान मोठी बेटे. तब्बल ३०० जुने पुराणे पाणी साठे म्हणजेच कदंब राजापासून आतापर्यंत सांभाळलेले आहेत. या राज्यात शंभरपेक्षा जास्त धबधबे आहेत. या सर्व धबधब्यांना औषधी मानले जाते. कारण गोव्यातील प. घाटात असलेल्या हजारो औषधी वनस्पतींतून, त्यांना स्नान घालत हा दक्षिण पश्‍चिम मॉन्सून या धबधब्यामधून खाली पृष्ठभागावर येतो. दूधसागर या आशियामधील सर्वांत मोठ्या धबधब्याच्या तुषारामधून रेल्वेचा प्रवास करणे खरे भाग्याचेच! मात्र यापुढे वातावरण बदलाची पहिली वक्रदृष्टी ही पाण्यावर असणार आहे.

माणसाने उघडे बोडके केलेले डोंगर, उगमापासूनच आटलेल्या नद्या, पृष्ठभागावर त्यांच्या कोरड्या पडलेल्या वाळूमुक्त खड्ड्यांमधून, घराघरामधील सांडपाणी, मैला जमा होऊन वाहणारे गटार ही भविष्यामधील आमची नदी असणार आहे. गोदावरी जिला आपण दक्षिण गंगा म्हणतो तिची आजची अवस्था पाहवतही नाही. कोकणामधील डोंगरावरील तिसऱ्या पिढीपर्यंत राखलेले जंगल आजच्या पिढीने कापून काजू लागवडीखाली आणलेले आहे. पूर्वीच्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांनी धरून ठेवलेली बहुमोल किमती माती आज त्यांचा आधार सुटल्यामुळे मोकळी सैल झाली आहे. म्हणूनच कोकणामधील नद्या डोंगरावरून उतरतानाच प्रचंड माती आणि सोबत मोठमोठे दगड, धोंडे, खडक घेऊन खाली येत आहेत. त्याचे पात्र सातत्याने बदलत आहे. मागील वर्षी कोकणामधील नद्यांनी या भूभागाला त्याच्या महापुराने उद्ध्वस्त केले. त्यात आमचे महाड आणि चिपळूण आघाडीवर होते. हे सर्व पाणी अरबी समुद्राला मिळून तसे वायाच गेले. असे गोव्यात का घडत नाही? कारण तेथील डोंगर आजही तिसऱ्या पिढीचे जंगल जोपासतात, म्हणूनच नद्यांना पूर येत असले तरी महापूर नसतात. या नद्यांमधून जल वाहतूक होऊन गोव्याची श्रीमंती म्हणूनच वाढत आहे. यामुळे बहुमोल जीवाश्म इंधनाची बचत होते. त्याचबरोबर हवेमधील कर्ब आणि वाढती उष्णतासुद्धा नियंत्रणात येते.

वातावरण बदलास सामोरे जाताना भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने जीवाश्म इंधनाची बचत करतानाच जल वाहतुकीस प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठीही नद्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. गोव्यापासून आज आपणास हेच शिकणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही नद्यातून वाळू उपसा, त्यांच्या किनाऱ्यांवर आक्रमण आणि त्याच्या मूळ नैसर्गिक वाहत्या पाण्याचा अस्त यातून मानव निर्मित घाणेरडे गटार करत आहोत. मुंबापुरीमधील सहाही नद्यांची अशी गटारे झालेली पाहिल्यावर मनास वेदना होतात. या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रतिवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात, पण परिस्थिती तशीच. याच थांबलेल्या नद्या (river) मुंबईमधील हवेत मिथेन वाढवून शहरास उष्ण करत आहेत. शरीरास थंड करण्यासाठी घराघरांत वातानुकूलित यंत्रणा बसविल्या जात आहेत. म्हणजे पुन्हा त्यातून बाहेर पडणारी उष्ण हवा शहरास गरम करत आहे. कर्ब आणि मिथेनपेक्षा सुद्धा जास्त उष्णताधारक असा वातानुकूलित यंत्रात वापरलेला ‘सीएफसी गॅस’ धोकादायक ठरत आहे. हे सर्व चक्र पुन्हा वाहत्या नदीजवळ येऊनच थांबते. वातावरण बदलास सामोरे जाताना सर्व नद्यांना त्यांच्या उगमापासून स्वच्छ वाहते करावयास हवे. गोव्यामधील नद्या उगमापासूनच वाहत्या आहेत. त्यांना वाहते करण्यासाठी डोंगरावरील उगमस्थानी असलेल्या वृक्षांचा फार मोठा वाटा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com