Chana Market : हरभरा उत्पादकांची होतेय लूट

नाफेडची हमीभावाने हरभरा खरेदी म्हणण्यापेक्षा आता केवळ नोंदणी सुरू आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

chana Rate : राज्यात हरभऱ्याची काढणी (Chana Harvesting) सुरू आहे. मराठवाड्यात या वर्षी उतारा थोडा कमी मिळतोय. काढणी सुरू झाल्यामुळे बाजारात आवकही (Chana Arrival) वाढत आहे. हरभऱ्याला हमीभाव ५३३५ रुपये प्रतिक्विंटल आहे.

नाफेडची हमीभावाने हरभरा खरेदी म्हणण्यापेक्षा आता केवळ नोंदणी सुरू आहे. नोंदणी करताना सातबारा उतारा (२०२२-२३ चा पेरा असलेला), बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स अशी कागदपत्रे देऊन आता नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणी करायची.

नंतर त्यांचा मेसेज येईपर्यंत वाट पाहायची. यापूर्वी अनेक वेळा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज आलेच नाहीत. मेसेज आल्यावर हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जायचा. तेथे आपल्या नंबरनुसार काटा होणार, त्यासाठी वाट पाहायची.

काटा करून पावती मिळणार आणि पैसे खात्यावर जमा होतील, असे शेतकऱ्यांना सांगितले जाते. मुळात या सर्व प्रक्रियेला उशीर, त्यात पैसे खात्यावर कधी जमा होतील, हे काही सांगता येत नाही.

Chana Market
Chana Bajarbhav : हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवून नोंदणीस मुदवाढ द्याः रविकांत तुपकर

या सर्व परिस्थिती चा फायदा गाव शिवारातील व्यापारी घेत आहेत. त्यांनी हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल १००० रुपये कमी भावाने (४३०० रुपये) खरेदी सुरू केली आहे. बहुतांश शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना हरभरा ४३०० ते ४५०० रुपये दराने विकत आहेत.

हे व्यापारी शेतातून अथवा घरून माल उचलून नगदी पैसे देतात. शेतकऱ्याकडे माल ठेवायला जागा नसते. त्याला पैशाची अडचण असते. शेतातून घरी आणि घरून बाजारात हरभरा नेण्यासाठी वाहतूक, हमाली असा खर्च करावा लागतो.

राज्यात बहुतांश शेतकरी बटाई नाहीतर मक्त्याने शेत करतात. त्यांच्याकडे ना सातबारा असतो ना पिकाची नोंद. अशा सर्व अडचणींमुळे आणि नाफेड खरेदीच्या एकूणच प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांना बहुतांश शेतकरी हरभरा देत असून, त्यांच्याकडून दिवसाढवळ्या लूट चालू आहे.

नाफेडच्या खरेदीचे तूर, कांदा, हरभरा या शेतीमालाबाबत शेतकऱ्यांचे मागील अनुभव खूप वाईट आहेत. शेतीमालाला जाहीर होणारे हमीभाव हा एक फार्स आहे. ते बहुतांश शेतीमालाला (हंगाम कोणताही असो) मिळतच नाहीत.

Chana Market
Chana Market : हरभरा विक्रीसाठी राज्यातील कोणत्या केंद्रांवर नोंदणी सुरू?

मी दोन दिवसांपूर्वी १० क्विंटल हरभरा ४३२५ रुपये प्रतिक्विंटल दराने गावातील व्यापाऱ्याला विकला आहे. माझ्या बटाईदारास काही दिवस हरभरा ठेवावा का? म्हणून विचारले असता, तो म्हणे ठेवून काही फायदा नाही. भाव काही जास्त वाढणार नाहीत.

डाळीची खुली जोरदार आयात चालू आहे, हे त्यांनाही माहीत आहे. तूर, सोयाबीन कापूस ठेवून काही फायदा झाला नाही शिवाय मला पैशाची गरज आहे, असे त्याचे उत्तर ऐकून मी ही त्यास हरभरा विकून टाक म्हणालो. हे आहे शेती अन् शेतकऱ्यांचे वास्तव...

लेखक - विजय सुकळकर, सहसंपादक ॲग्रोवन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com