Grape Advisory : फुलोरा, मणीलाग अवस्थेतील गळ; कारणे, उपाययोजना

जास्त पाऊस झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. या स्थितीमध्ये फुलोरा गळ आणि मणीगळ दिसून येण्याची शक्यता असते. त्यामुळे बागेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
 Grape Advisory
Grape Advisory Agrowon

उत्तम घडाच्या निर्मितीसाठी उच्च प्रकाशाची तीव्रता, उबदार तापमान, जमिनीतील पुरेसा ओलावा आणि पोषक तत्त्व इत्यादी घटकांचा समावेश होतो. प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला उत्तम प्रतीच्या घडाची निर्मिती हवी असते. फलित फुले द्राक्षात आणि नंतर ते परिपूर्ण कलस्टरमध्ये विकसित होतात. मात्र द्राक्षाची नाजूक फुले पाऊस, वारा किंवा थंड तापमानाच्या संपर्कात आल्यास फुलोरा अवस्थेत गळ झालेली दिसून येते. या परिस्थितीमध्ये बागेमध्ये फुलोरा गळ व मणीगळ ही वनस्पती शास्त्रीय विकृती दिसू लागते. जास्त पाऊस झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. ही स्थिती विविध रोग आणि किडींच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. तसेच फुलोरा गळ आणि मणीगळ देखील दिसून येण्याची शक्यता असते. या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे बागेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 Grape Advisory
Grape Advisory : द्राक्षातील देठावरील गाठीची समस्या

फुलोरा गळ ः
- ही विकृती वातावरणातील बदल, वेलीतील अन्नसाठा, संजीवकांचा समतोल व पाण्याचे जमिनीतील प्रमाण या घटकांवर अवलंबून असते.
- कॅनॉपी जास्त दाट असल्यास सर्वच घड आणि मण्यांना अन्नद्रव्यांचा पुरवठा विपुल प्रमाणात होत नाही. अशावेळी फुलोरा गळ होते. जर मणी लाग झाल्यास पुढे गळ सुद्धा होते.

मणीगळ ः
- ही विकृती फुलोरा अवस्था सुरू होण्यापूर्वी आणि फुलोरा अवस्थेत आढळून येते.
- घडाला टिचकी मारली तरी न फुललेले किंवा फुललेले मणी गळून पडतात. पूर्ण घड रिकामा झाल्याप्रमाणे दिसतो. त्यामुळे उत्पादनात घट येते.
- जमिनीत फॉस्फरसचे जास्त प्रमाण, पोटॅशिअमचे कमी प्रमाण, जास्त क्षारता, पाण्याचा ताण इत्यादी बाबींमुळे ही विकृती दिसून येते.

 Grape Advisory
Crop Advisory : हरभरा पीक सल्ला

फुलोरा व मणीगळवर परिणाम करणारे घटक ः
- वातावरणातील बदल ः दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत.
- अन्नद्रव्य किंवा संजीवकांचा समतोलपणा ः फॉस्फरसचे जमिनीतील जास्त प्रमाण आणि वेलीतील ॲबसेसिक ॲसिडचे जास्त प्रमाण.
- द्राक्ष जातीची ताण सहन करण्याची क्षमता.
- वेलीची कॅनॉपी खूप जास्त.

उपाययोजना ः
- वेलीवर घडांची संख्या निर्धारित ठेवावी.
- वेल विस्तार व्यवस्थापन योग्य ठेवावे. त्यामुळे सुटसुटीत कॅनॉपी तयार होईल. वेलीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून पोषणासाठी आवश्यक अन्नसाठा उपलब्ध होईल. त्यामुळे विकृती टाळता येईल.
- पाण्याचा ताण देऊ नये.
- संजीवकाचा वापर योग्य प्रकारे करावा. घडाचा विस्तार व्यवस्थित झाला असल्यास फुलोरा अवस्थेत जिब्रेलिक ॲसिडचा वापर टाळावा. तसेच बरीच रसायने एकत्रित मिसळून वेलीला देऊ नयेत.
- फुलोरा अवस्थेआधी ः जी.ए. अधिक बुरशीनाशक अधिक पी. एच. कमी करणारे रसायन एकत्रित द्यावे.
- मणी ३ ते ४ मिमी आकाराचे झाल्यानंतर- जी.ए. अधिक बुरशीनाशक अधिक पी. एच. कमी करणारे रसायन अधिक सीपीपीयू
रसायन एवढीच एकत्रित द्यावीत.

(टीप- लेखात शिफारस केलेली कोणतेही रसायने वा घटक वापरताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा व मगच त्यांचा अवलंब करावा.)
-------------------------------
संपर्क ः
- डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com