Grape Management : मणी तडकण्याच्या समस्येसाठी वेळीच उपाययोजना आवश्यक

मागील काही दिवसांत द्राक्ष पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊसही झाला. ही स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
Vineyard Management
Vineyard ManagementAgrowon

डॉ. एस. डी. रामटेके, स्नेहल खलाटे, अमृता लंगोटे

मागील काही दिवसांत द्राक्ष पट्ट्यात (Grape Belt) बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊसही झाला. ही स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे. अशावेळी घड विकास अवस्थेत असलेल्या बागांमध्ये मणी तडकणे (Grape Cracking) तसेच भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणे इत्यादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

Vineyard Management
vineyard Damage : पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

मणी तडकणे

मणी तडकणे ही टेबल आणि वाइन द्राक्ष उत्पादनातील एक मोठी समस्या आहे.

या समस्येमुळे द्राक्षांची गुणवत्ता ढासळते, साठवणक्षमता कमी होते.

मणी तडकल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत द्राक्षघड असलेल्या बागांमध्ये पाऊस झालेला असल्यास किंवा ढगाळ वातावरणीय स्थितीमुळे मणी तडकण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते.

या तडकलेल्या मण्यांमुळे मणी सडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तडकलेल्या मण्यांवर माश्या किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

उपाययोजना

या बागेत प्रत्येक घडामध्ये एक किंवा दोन मणी तडकलेले दिसत असल्यास असे मणी आधी काढून घ्यावे. ते बागेच्या बाहेर सुमारे दोन फूट खोलीच्या खड्ड्यात पुरावेत.

बागेत ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घेतल्यास फायदा होईल.

ज्या द्राक्ष भागामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तिथे मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये आधीच योग्य तितका ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पाणी दिल्यामुळे मण्यातील अंतर्गत दाब आधीच तयार होतो. त्यामुळे पुढे पाऊस झाला तरी दाब येत नाही. यामुळे मणी तडकण्याचे शक्यता कमी होईल.

पाऊस झालेल्या स्थितीतील बागेत एकतर पावसापूर्वी किंवा पाऊस संपल्यानंतर लगेच कायटोसॅन २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे परिस्थिती काही अंशी नियंत्रणात राहील.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६

(प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com