Gawar Gum : असे बनवले जाते गवार गम

विशिष्ट क्षमतेमुळे गवार गमचा औद्योगिक वापर वाढतो आहे. गवार गम मुख्यतः स्थिरीकारक म्हणून वापरतात.
Guar Gum Production
Guar Gum ProductionAgrowon

गवार गम (Guar Gum) म्हणजेच गवार डिंक हे गवार बियांपासून मिळते. गवार गम पावडरच्या स्वरूपात अन्न, औषधी, कागद, कापड, स्फोटक, तेल विहीर खोदकाम आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. विशिष्ट क्षमतेमुळे गवार गमचा औद्योगिक वापर वाढतो आहे. गवार गम मुख्यतः स्थिरीकारक म्हणून वापरतात. हे गवार गम कसे तयार करतात याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

Guar Gum Production
Goat Milk : शेळीचे दूध आरोग्यदायी का मानले जाते?

प्रक्रियेचे तंत्र ः

१) गवार बिया शेंगांमधून काढल्या जातात. बिया गोलाकार, तपकिरी रंगाच्या असतात. भाजणे, चाळणे आणि पॉलिश या यांत्रिक प्रक्रियेद्वारे बियाण्यांमधून डिंक काढला जातो.

२) बियाण्यामधून डिंक काढल्यानंतर जो चोथा मिळतो त्यापासून जनावरांसाठी पेंड बनविली जाते.  

३) गवार पावडरच्या कणांच्या आकारानुसार प्रतवारी केली जाते. रंग, जाळीचा आकार, स्निग्धता क्षमता आणि हायड्रेशनचा दर यावर या डिंक पावडरचे विविध स्तर उपलब्ध आहेत.

४) गवार डिंकाच्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये हायड्रेशन आणि फ्लेकिंग करण्यापूर्वी एक्सट्रूझन केले जाते. या प्रक्रियेनंतर बिया दळून पावडर वाळवली जाते. एक्सट्रूजन आणि सुधारित हायड्रेशन प्रक्रियेमुळे गुणवत्तापूर्ण गवार डिंक पावडर मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com