Guava : शेतकरी पीक नियोजन : पेरू

आमची केळवद, ता. चिखली, जि. बुलडाणा येथे वडिलोपार्जित २ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर २० वर्षांपूर्वी पेरूची २० बाय २० फूट अंतरावर २८८ झाडांची लागवड केली होती.
Guava
Guava Agrowon

शेतकरी ः निवृत्ती पांडुरंग पवार

गाव ः केळवद, ता. चिखली, जि. बुलडाणा

पेरू क्षेत्र ः १ एकर

एकूण झाडे ः ४५५

अनुभव - १५ वर्षे

------------------

आमची केळवद, ता. चिखली, जि. बुलडाणा येथे वडिलोपार्जित २ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर २० वर्षांपूर्वी पेरूची २० बाय २० फूट अंतरावर २८८ झाडांची लागवड केली होती. सध्या माझ्याकडील १ एकरामध्ये जुन्या लागवडीतील १०० झाडे आहेत. मी २०१६ मध्ये १० बाय १० फूट १० अंतरावर ३५५ झाडांची लागवड केली. सध्या माझ्याकडे अतिघन पद्धतीने लागवड केलेली पेरूची (Guava) सुमारे ४५५ झाडे आहेत. बागेत लखनौ ४९, जी विलास, ललित आणि सरदार या जातींची मिश्र स्वरूपात झाडे आहेत. अतिरिक्त उत्पन्नासाठी बागेत सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून बागेतील व्यवस्थापनाचा खर्च निघण्यास मदत होते. (Guava Crop Management)

Guava
शेतकरी पीक नियोजन : पेरू

छाटणी व व्यवस्थापन ः

- मी बागेत प्रामुख्‍याने मृग बहराचे नियोजन करतो. त्यानुसार बागेस १ ते १५ मे या कालावधीत ताण दिला. साधारण अर्धी पानगळ झाल्यानंतर १६ मे च्या दरम्यान बागेतील मोठ्या झाडांची छाटणी करून घेतली.

- छाटणी वेळी झाडाच्या फांद्यांना इजा होते. त्यासाठी छाटणीनंतर तिसऱ्या दिवशी झाडांवर बोर्डो मिश्रण आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करून घेतली.

- रिंग पद्धतीने १५ः१५ः१५ हे खत प्रतिझाड १ किलो प्रमाणे दिले. त्यानंतर ३- ४ तास ठिबक संच सुरू ठेवून हलके सिंचन करून घेतले.

- पेरूच्या खोडामध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी खोडांची वेळोवेळी तपासणी केली जाते. खोडामध्ये पिठ्या ढेकणाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळून येतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार शिफारशीत कीडनाशकांच्या फवारणी केली जाईल.

Guava
पेरू फळपिकासाठी विमा योजना

बागेची स्वच्छता ः

मजुरांच्या मदतीने संपूर्ण बागेची स्वच्छता केली. बागेतील गवत काढून घेतले. ठिबकच्‍या नळ्या गोळा करून व्यवस्थित ठेवल्या. झाडांचे आळे रिंग पद्धतीने व्यवस्थित करून घेतले.

पालापाचोळ्यापासून खत ः

पानगळ केल्यानंतर बागेत मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला होता. हा सर्व पालापाचोळा गोळा करून त्याचे खत तयार केले जाते. त्यासाठी १० फूट आकाराचा खड्डा करून त्यात सर्व पालापाचोळा टाकला. कुजण्याची क्रिया लवकर होण्यासाठी जिवाणू कुजविणारे घटकांचे मिश्रण आणि नंतर पाणी सोडले. पालापाचोळा चांगला कुजल्यानंतर उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होईल.

बागेत आंतरपिकाची लागवड ः

संपूर्ण पेरू बागेत दरवर्षी खरीप हंगामात आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड केली जाते. त्यानुसार टोकण यंत्राच्या मदतीने ५ जुलै रोजी सोयाबीन लागवड केली. एक एकरावर सोयाबीन लागवडीसाठी साधारण २१ किलो बियाणे लागले. सध्या पिकाची उगवण सुरू झाली आहे. येत्या काळात आवश्यकतेनुसार मजुरांकडून निंदणी किंवा कोळपणी केली जाईल.

आगामी नियोजन ः

- पुढील महिनाभरात झाडावर पालवी फुटेल व त्यानंतर काही दिवसांनी कळी अवस्था सुरू होईल. या अवस्थेत कळी व फूल निरोगी राहावे म्हणून बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाईल.

- या काळात झाडांवर प्रामुख्याने मावा किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो असा अनुभव आहे. किडीचा प्रादुर्भाव पाहून नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकाची फवारणी घेतली जाईल.

- कळी अवस्था सुरू झाल्यानंतर खतांच्या मात्रा ठरविल्या जातील.

- निवृत्ती पवार, ९३२५५०५७४४

(शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com