बोपगावात सीताफळ प्रक्रियेवर मार्गदर्शन

सीताफळ (Custard Apple) हे पुरंदरमधील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे फळपीक मानले जाते. फक्त शेतामध्ये फळे न पिकवता त्यावर उत्तम प्रकारे प्रक्रिया करून बाजारात चांगल्या बाजार भावाने आपला माल विकला जाऊ शकतो.
Custard Apple
Custard AppleAgrowon

पुणे : ग्राम विकास कृषी शक्ती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे (Farmer Producer Company) स्मार्ट शेतीअंतर्गत मूल्यसाखळी विकास शेतीशाळा व सर्वसाधारण सभा बोपगाव (ता. पुरंदर) येथे नुकतीच झाली. सीताफळ (Custard Apple) लागवडीपासून ते काढणीनंतर प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सीताफळ (Custard Apple) हे पुरंदरमधील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे फळपीक मानले जाते. फक्त शेतामध्ये फळे न पिकवता त्यावर उत्तम प्रकारे प्रक्रिया करून बाजारात चांगल्या बाजार भावाने आपला माल विकला जाऊ शकतो. या बाबत पुरेपूर मार्गदर्शन या शेती शाळेद्वारे शेतकऱ्यांना देण्यात आले.

सीताफळ लागवडीच्या (Custard Apple Cultivation) छोट्या तांत्रिक बाबी लक्षात घेतल्यास उत्पन्नात वाढ होऊन पुरंदर सारख्या तालुक्यामध्ये मोठ्या आर्थिक उलाढालीचे पीक म्हणून सीताफळ (Custard Apple) पुढे आले आहे. त्यामुळे सीताफळ हा पुरंदरमधील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आर्थिक माध्यम बनले आहे.

Custard Apple
FCI: तेलंगणात तांदूळ प्रक्रियेसाठी मुदतवाढ

‘सीताफळ कीड-रोग व्यवस्थापन’ विषयी मार्गदर्शन करताना बहर धरल्यापासून सीताफळ बाजारात पोहोचेपर्यंत म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) बाबत मार्गदर्शन करताना मातीमध्ये टाकावयाची बुरशीनाशके, कीटकनाशके, फवारणी करायचे कीटकनाशक, बुरशीनाशक अशा एकात्मिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com