फवारणी, धुरळणी अवजारांची हाताळणी, देखभाल

सर्वात महत्त्वाची प्राथमिक बाब म्हणजे ज्या रसायनाची आपण फवारणी करणार आहोत, त्याचा डबा, पॅकेट आणि सोबत मिळालेल्या घडीपत्रिका (लेबल क्लेम) यावरील सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
Pesticide
Pesticide Agrowon

कीडनाशकांच्या फवारणीपूर्वी घ्यावयाची काळजी ः ०

सर्वात महत्त्वाची प्राथमिक बाब म्हणजे ज्या रसायनाची आपण फवारणी (Pesticide Spraying) करणार आहोत, त्याचा डबा, पॅकेट आणि सोबत मिळालेल्या घडीपत्रिका (लेबल क्लेम) (Label Claim) यावरील सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

- प्रत्येक किडीची एक आर्थिक नुकसान पातळी ठरलेली आहे. त्यापेक्षा प्रति पान किंवा झाड संख्या झाल्यानंतरच त्या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्याचे समजले जाते. त्यानंतरच फवारणीचा निर्णय घ्यावा.

Pesticide
Fertilizer Import : खत आयातीवरील अवलंबित्व कायम

-कीडनाशकाचे विषारीपण ठरविणाऱ्या खुणेकडे लक्ष द्यावे. लाल रंगाचे त्रिकोण असलेले रसायन अत्यंत विषारी असून, त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. संख्या कमी असताना वनस्पतिजन्य, कमीत कमी हानिकारक अशा कीडनाशकांची निवड करावी. फवारणी शक्यतो हिरवा ते निळा त्रिकोण असलेल्या कीडनाशकांची करावी. प्रादुर्भावाचे प्रमाण फारच अधिक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- कीड रोगाच्या प्रादुर्भावाची स्थिती, लेबल क्लेमद्वारे असलेली शिफारस, तज्ज्ञांचा सल्ला या सर्वांचा विचार करून योग्य ते कीडनाशक व त्याची मात्रा ठरवावी.

Pesticide
Pesticide Ban: केंद्राकडून 'त्या' २७ किटकनाशकांवर बंदीबाबत निर्णयाची शक्यता

- एकापेक्षा जास्त कीडनाशके एकत्र करणार असल्यास त्यांची समायोजकता (कॉम्पॅटॅबिलीटी) तपासून घ्यावी.

-फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.

- कीडनाशक द्रावण तयार करतेवेळी लहान मुले किंवा अन्य व्यक्ती जवळपास येणार नाहीत, याची खात्री करावी.

- कीडनाशक हुंगणे, वास घेणे टाळावे.

- उपाशीपोटी फवारणी करण्यापेक्षा योग्य आहार घेऊन भरपूर पाणी पिल्यानंतर फवारणीला सुरुवात करावी. फवारणीदरम्यान काहीही खाणे, पिणे ( अगदी तंबाखू, धूम्रपान इ.) टाळावे.

- फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी योग्य ती साधने वापरावीत. उदा. फवारणीसाठी वेगळे संरक्षक कपडे, गॉगल, हातमोजे, बूट, टोपी, मास्क इ.

फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी

-फवारणी यंत्राची योग्यरित्या चाचणी करून घ्यावी. यंत्राची टाकी, नोझल, पाइपमध्ये गळती नसल्याची खात्री करावी. गळती असल्यास दुरुस्ती करून घ्यावी.

- झिजलेले , खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.

-फवारणीपूर्वी फवारणी यंत्र स्वच्छ धुवून घ्यावे.

- कीडनाशके द्रावण फवारणी यंत्रात भरतेवेळी सांडू नये यासाठी नरसाळ्याचा (चाडीचा) वापर करावा.

- तणनाशकाच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पंप असावा. ते शक्य नसल्यास दर फवारणीनंतर त्वरित भरपूर साबण आणि पाण्याच्या साह्याने स्वच्छ करावा. त्यानंतर उन्हामध्ये चांगल्या प्रकारे कोरडा करूनच अन्य फवारणीसाठी वापरावा.

- शेतामध्ये वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर फवारा येणार नाही, यानुसार फवारणीची दिशा ठरवावी. योग्य संरक्षणात्मक कपडे अत्यावश्यकच आहेत.

- वेगवान वारे, उच्च तापमान आणि पावसात फवारणी करू नये.

- फवारणी वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

- फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोईस्कर तार, काडी किंवा टाचणी जवळ ठेवावी.

-फवारणी झाल्यानंतर वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावे. हे साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुऊ नयेत.

- फवारणी झाल्यानंतर शक्यतो भरपूर साबण आणि पाण्याने स्वच्छ अंघोळ करावा. विशेषतः हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

- कीडनाशकांच्या रिकाम्या बाटल्या, पॅकेट त्वरित नष्ट करून टाकाव्यात.

-फवारणीचे काम करणाऱ्या व्यक्तीने फार काळ सलग फवारणी करणे टाळावे. दर दिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ फवारणीचे काम करू नये.

- फवारणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला विषबाधेचे कोणतेही असाधारण लक्षण दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे. त्यावेळी त्या

कीडनाशकाचे लेबल सोबत न्यावे. या लेबलमध्ये या कीडनाशकाचा ॲण्डीडोट बाबतही माहिती दिलेली असते.

डॉ. तुळशीदास बास्टेवाड

(अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com