Mushroom Farming : उत्तराखंडची मशरूमची शेती पाहिलीय का?

ऑयस्टर मशरूम तरारून वर आलं होतं आणि थोड्याच वेळात त्यातली काही पानं माझ्या ताटात मानानं विसरणार होती.
Mushroom Farming
Mushroom FarmingAgrowon

मी महाराष्ट्रातील शेतकरी आहे म्हटल्यावर गडी चांगलाच खुलला. आत... घरात चला... तुम्हाला माझी शेती दाखवतो म्हणाला आणि दोन तीन कप्पे आत एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याची शेती बहरू लागली होती. ऑयस्टर मशरूम (Oyster Mushroom) तरारून वर आलं होतं आणि थोड्याच वेळात त्यातली काही पानं माझ्या ताटात मानानं विसरणार होती.

Mushroom Farming
APMC Profit : खेड बाजार समितीला दोन कोटींचा नफा

सध्या उत्तराखंडच्या मोहिमेवर आहे. तिथं शीतलाखेत या गावाला आलोय. हे शीतलाखेत म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्य, वनसंपदेसाठी, नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध असं आडबाजूचं बिनगर्दीचं गाव. आठ दहा दुकानं, दोन तीन टपरीवजा नाश्ता सेंटर वगळता खायचं फार काही नाही.

Mushroom Farming
APMC : नामपूर बाजार समितीच्या सभेत गदारोळ

माझ्यासोबत कोल्हापुरी गडी अभिजित कुपटे आहे. त्याला आणि मला स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायची लहर आली. पण स्थानिक मंडळी चंबूगबाळ आवरून चिल्लीपिल्ली बखोटीला मारून ७ वाजताच रामलिलेला पळायच्या बेतात. त्यामुळे तो बेत फसत आलेला असताना तिवारी भाऊ भेटले.

Mushroom Farming
Pune APMC : ‘डमी’ अडत्यांमुळे शेतकरी असुरक्षित

चावमिनच्या दोन प्लेट शिल्लक होत्या. तीन मोमो उरले होते. ते आमच्या वाट्याला आले. पिक पाण्याची चौकशी केली आणि शेतीची नाळ जुळली. आणि त्यानं त्यांची मशरुमची शेती माझ्यासमोर खोलली. थोड्या वेळापूर्वी आम्ही गिऱ्हाईक होतो, आता पाहुणे झालो होतो.

Mushroom Farming
Pune APMC : डमी अडत्यांची ‘कुंडली’ सादर करण्याचे आदेश

मग त्यानं पाहुणचाराची मॅगी बनवायला घेतली. कोल्हापुरी मास्टर शेफ अभिजित कुपटे त्यांना मार्गदर्शन करू लागले. त्यात माझ्या हातानं पक्व ऑयस्टर काढून बनवायला दिलं. कोबी + कांदा + मशरूम मॅगी : भन्नाट कॉम्बो तयार झाला. ताज्या मशरूम मुळे चार चांद लागले.

उत्तराखंड मध्ये, विशेषतः कुमाऊ हिमालयात जेथे विस्थापनाची समस्या प्रचंड गंभीर आहे, तेथे मशरूम क्रांती सुरू आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. घरोघरी मशरूम उत्पादन होत आहे. व्यवसायिक प्रकल्पांना ५० ते ८० टक्के अनुदानाचं भरीव सरकारी पाठबळही मिळतंय. प्रशिक्षणाची सोय आहे. मशरूमचं बीज आणि ते वाढवायचं सर्व मटेरियल माफक दरात सहजपणे मिळत आहे.

वातावरण बाराही महिने नैसर्गिकरित्या मशरूम उत्पादनाला पोषक आहे आणि स्थानिक पहाडी लोकांच्या आयुष्याचा मशरूम हा पिढ्यानपिढ्यांचा महत्वाचा भाग असल्याने लोकांचा त्याकडे कल ही वाढता आहे.

उत्तराखंड आज जवळपास संपूर्ण उत्तर भारताला मशरूम पुरवठा करत आहेत. दिव्या रावत सारखी नवतरूणाई यातून व्यवसायिक म्हणून यशस्वीरित्या नवी शितिजं गाठत आहे. अजून काय पाहिजे...

शेती संलग्न व्यवसायात एंड टू एंड सपोर्ट सिस्टिम राबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवू पाहणारा अलिकडच्या काळातला हा सर्वात महत्वाचा व व्यापक बदल असावा कदाचित. उत्तराखंडचं मशरूम मॉडेल महाराष्ट्राला ही रोडमॅप ठरावं असं आहे.

मुख्य काम उरकून इथले मशरुमचे काही प्रोजेक्ट पहायचे आहेत. डोंगरउतारावरील शेतीचे ही काही पॅटर्न अभ्यासायचेत. वेळ जुळली तर दिव्या रावत लाही भेटायचंय. पाहूया काय काय जुळतंय... तोपर्यंत मशरुमच्या स्थानिक जाती आणि भाज्या आहेतच सोबतीला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com