Neera Production
Neera ProductionAgrowon

Neera Production : आरोग्यदायी नीरा निर्मिती तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाद्वारे नीरेवर प्रक्रिया करून त्यातील पोषकमूल्यांसहित साठवणूक करता येते. नारळापासून उपलब्ध झालेल्या निरेवर प्रक्रिया आणि साठवण करण्याचे तंत्रज्ञान विविध संस्थांकडे उपलब्ध आहे.

अनुप्रीता जोशी, कु.शीतल चव्हाणके

Neera Prcocessing उन्हाळ्यामध्ये खूप पाणी प्यायल्यामुळे भूक थोडी कमी होते. पर्यायाने अशक्तपणा किंवा गळून गेल्यासारखं वाटते. अशावेळी शरीरातील पाण्याचा () समतोल राखणे, शक्ती भरून काढण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी नीरा (Healthy Neera) फायदेशीर आहे.

नीरा हे चवीला (Test Of Neera) गोड व कमी उष्मांक असलेले पेय आहे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहासारख्या (Diabeties) जीवनशैलीशी निगडित आजारांवर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. नीराच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील मदत होते.

नीरा प्रक्रिया तंत्रज्ञान ः

१) नारळ आणि ताडाच्या झाडांना फुलोरा यायला लागला की तो दोरीने घट्ट बांधून त्याच्या टोकाला कोयत्याने चीर दिली जाते. त्यातून बाहेर पडणारा द्रव खाली मडक्यात साठवला जातो. यालाच नीरा म्हणतात. पण काही तासांपुरतीच नीरा आहे त्या स्थितीत राहते. त्यानंतर नैसर्गिकरित्या आंबून त्याचे ताडीमध्ये रूपांतर होते.

२) तंत्रज्ञानाद्वारे नीरेवर प्रक्रिया करून त्यातील पोषकमूल्यांसहित साठवणूक करता येते. ती आंबू नये म्हणून प्रक्रिया करून झाली, की तिच्यात असलेला मायक्रोफ्लोरा हा घटक काढून टाकण्यासाठी पाश्चराइज केली जाते. त्यानंतरही नीरा आंबू नये म्हणून ती बर्फात थंड करत ठेवली जाते.तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केलेली ही नीरा सामान्य तापमानात केवळ दो महिने टिकू शकते. मात्र फ्रिजमध्ये ४ ते ६ महिने साठवता येते.

३) नीरेमध्ये नैसर्गिकरित्या आंबवण होत असल्यामुळे नारळापासून जमा केलेले नीरा काही तासातच ताडीमध्ये रूपांतरित होते. या ताडीमध्ये चार टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. काही तासातच नैसर्गिक रित्या आंबवण प्रक्रिया वाढत जाऊन निरेमधील अल्कोहोलचे प्रमाण वाढत जाते.

४) निरेचे नैसर्गिक आंबवण प्रक्रिया टाळण्यासाठी एक लिटर निरेमध्ये दहा मिलि याप्रमाणे आंबवण थांबवण्यासाठी शिफारशीनुसार रसायन वापरले जाते. नीरेचे नैसर्गिक आंबवण प्रक्रिया थांबविण्यासाठी सर्वसाधारणपणे केएमएस (पोटॅशियम मेटाबाय सल्फेट) आणि लिंबू सत्त्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड यांचा एकत्रितपणे वापर केला जातो.

Neera Production
Orange Processing : संत्रा प्रक्रिया केंद्राच्या घोषणेचे उत्पादकांकडून स्वागत

५) ताज्या जमा केलेल्या निरेचा सामू ६.६ ते ७.४ असतो. प्रत्येक झाडानुसार त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. नैसर्गिक आंबवण प्रक्रिया थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनामुळे निरेचा नैसर्गिक सामू ५.१ ते ५.३ पर्यंत कमी होतो. त्यानंतर नीरा साठवणूक सहा महिन्यांपर्यंत करता येते.

६) सामू कमी केल्यानंतर उष्णतेची प्रक्रिया करून नीरा साठवण क्षमता वाढवू शकतो. परंतु उष्णतेच्या प्रक्रियेमध्ये निरेमधील पोषण तत्त्वांचे प्रमाण कमी होऊ शकते. नीरा रेफ्रिजरेटरमध्ये कमी तापमानाला ठेवून त्यामध्ये असणारे सूक्ष्मजंतू यांची वाढ व विकरांमुळे होणारी रासायनिक प्रक्रिया थांबवता येते.

Neera Production
Healthy Neera : आरोग्यदायी नीरेचे फायदे

पोषक घटकांचे प्रमाण

पोषक घटक---श्रेणी---सरासरी

सामू ---६.५७ - ७.५---६.९८

पोटॅशियम---१४६.१ - १८२.४---१६८.४

कर्बोदके---१०.०८ - १४.५०---१३. १८

फॉस्फरस---२.० - ६.४---३.९

मँगेनीज---०.००९ – ०.०१४---०.०१२

कॉपर---०.०२८ – ०.०३५---०.०३१

झिंक---०.०१८ – ०.०२६---०.०२०

लोह---०.०४९ – ०.०५८---०.०५३

सोडियम---६९. ४ -११७.५---९०.६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com