Wild Vegetable : आरोग्यदायी रानभाज्या

Wild Vegetable
Wild Vegetable Agrowon

चिवळ/चिवळी

स्थानिक नाव : चिवचो, घोळाची, चिगळाची भाजी

उपयुक्तता ः

१) या भाजीत अनेक पोषक घटक जीवनसत्त्व अ, खनिजे आणि तंतूमय घटक मोठ्या प्रमाणात असतात.

१०० ग्रॅम भाजीमध्ये १२० आय.यु. जीवनसत्त्व अ मिळते.

२) त्वचा आणि डोळ्यांच्या विकारासाठी उपयुक्त आहे.

३) भाजी शितल असून रक्त शुध्द करते. रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवते.

४) मूळव्याध, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग मधुमेह, संधीवात इतर आजारांवर घोळ भाजी गुणकारी आहे.

५) कमी कॅलरी असणाऱ्या या भाजीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य टक्के असते.

६) भाजी अन्न पचनास मदत करते, यकृताचे कार्यही सुधारते

७) ओमेगा फॅटी अॅसिडचे प्रमाण घोळ भाजीत इतर कोणत्याही भाज्यांच्या मानाने सर्वात जास्त असते. १०० ग्रॅम घोळीच्या भाजीत ३५० ग्रॅम ओमेगा फॅटी ॲसिड असते.

Wild Vegetable
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

तांदुळजा

स्थानिक नाव : तांदुळजा, चवळीची भाजी

उपयुक्तता :

१) ताप, टायफॉईड, मलेरिया आजारांमध्ये तोंडाची चव गेलेल्या रुग्णाला ही भाजी आवर्जून देतात. ही भाजी खाल्ल्याने भूक अतिशय चांगली लागते.

२) ताप आल्यावर भाजी खाल्ल्यास ताप कमी होतो. ताप, चक्कर यावर ही भाजी गुणकारी आहे. तांदुळजाचा रस काढून पिल्याने पोटाचे विकार कमी होतात.

३) शरीरात जीवनसत्त्व क ची वाढ करते.

४) गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.

५) विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.

६) उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.

७) डोळ्यांच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीकरीता फार उपयुक्त आहे.

Wild Vegetable
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे काय?

काटेमाठ

स्थानिक नाव :- जंगली माठ/राजगिरा

उपयुक्तता :

१) काटेमाठ शितल, मुत्रजनक, दिपक, संसर्गरक्षक, सारक, ज्वरशामक गुणधर्माची आहे. मुळे औषधात वापरतात.

२) गर्भाशयास शक्ती देणारी आहे, भूक वाढवणारे आहे.

३) पित्तप्रक्रोप, रक्तविकार, श्वासनलिका दाह, मूळव्याध, श्वेतप्रदर या विकारांवर गुणकारी आहे.

उंबर

स्थानिक नाव : उंबर, औदुंबर

उपयुक्तता :

१) रक्तवाहक व सुजयुक्त दुखण्यावरील औषध.

२) कफाबरोबर नाकातून रक्त वाहत असेल, लघवीतून रक्त जात असेल तसेच आव यासारख्या विकारात फळांचा वापर करतात.

३) गर्भपात बंद होण्यास हे औषध दिल्यास गर्भास इजा पोहचत नाही.

४) लहान मुले झुरतात, खाल्लेले अंगी लागत नाही, उलट्या, जुलाब होतात, अशक्तपणा वाढतो अशावेळी चिकाचे दहा थेंब दुधाबरोबर देतात.

५) गालगुंड, गंडमाळा व सूज यांवर चीक लावतात. कंबरदुखीसाठी कंबरेवर तर दम्यात छातीवर चीक लावतात.

उंबराच्या मुळातून जे पाणी निघते ते शीतल, स्तंभन व पौष्टिक असते. गोवर आणि मधुमेहात उंबराचे पाणी गुणकारी आहे.

६) साल दमा व मुळव्याधीत उपयुक्त आहे.

Wild Vegetable
Wild Vegetable : रानभाज्यांच्या संवर्धनाला मिळतेय बळ

सुरण

स्थानिक नाव : सुरण

उपयुक्तता :

१) पाने, कंद, मुळ उपयुक्त असून औषधी आहेत.

२) सुरणात अ, ब, क ही जीवनसत्त्वे आहेत.

३) पचनसंस्थेसाठी अतिशय उपयुक्त. मूळव्याधीवर सर्वोत्तम समजले जाते.

४) आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे.

५) कफ, वात, दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांसारख्या दोषांवर भाजी उपयोगी आहे.

पाथरी

स्थानिक नाव : पाथरी

उपयुक्तता :

१) अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतीणीचे दूध वाढते.

२) कोरड्या खोकल्यामध्ये याचे चाटण उपयुक्त आहे.

३) पित्तशमन करणारे असून रक्त शुध्दीसाठी उपयुक्त. त्यामुळे त्वचेचे आजार व अशक्तपणा दूर होतो.

४) कावीळ व यकृत विकारात भाजी उपयुक्त आहे.

कुरडू

स्थानिक नाव : कुरडू, सीलगोटी, कोंमडा

उपयुक्तता :

१) बिया औषधात वापरतात.

२) बिया, थंड, शीतल, स्नेहन करणाऱ्या व पौष्टिक गुणधर्माच्या आहेत.

३) बियांचा फाटा जुलाबात देतात.

४) निद्रानाशात झोप येण्यासाठी बियांची भाजी करून देतात.

गोखरू

स्थानिक नाव : सराटा, काटे गोखरु, लहान गोखरु

उपयुक्तता :

१) मुतखडा, प्रमेह सारख्या व्याधीत उपयुक्त

२) हृदय रोगींसाठी कंबर दुखी व अंग दुखीवर उपयुक्त

३) गर्भाशयाची शुद्धी होऊन वांझपणा नाहीसा होण्यासाठी उपयुक्त.

भुईआवळा

स्थानिक नाव : भुईआवळा

उपयुक्तता :

१) कावीळ झाल्यास भुईआवळा वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ घेतात.

२) यकृत वृद्धी व प्लीहावृध्दा कमी करण्यास करतात.

३) मुतखडा, जंतुसंसर्ग आजारात तसेच उन्हाळी सारख्या त्रासावर गुणकारी आहे.

४) रक्तदाब वृद्धी, चक्कर येणे या आजरात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा होते.

५) सर्दी, खोकला, ताप, तसेच मलेरिया सारख्या थंडीतापाच्या आजारात नियमित भाजी खाल्ल्यास आराम होतो.

-------------------

संपर्क ः

डॉ.प्रणिता कडू, ८६०५३०८९१३

(कृषी विज्ञान केंद्र, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com