
शेतीमध्ये रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizers) वापरामुळे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) वापर होण्याची आवश्यकता आहे.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके (Green Manuring Crop) फायद्याची ठरू शकतात. याशिवाय दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाच प्रमाण हळू हळू घटत.
अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात. शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेल्या पिकांना हिरवळीची खते असे म्हणतात.
जेव्हा आंतरपीक घेतलेले पीक, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्याच शेतात नांगरून मिसळले जाते, त्यास शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात.
उदा. ताग, गवार ,चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो.
हिरवळीच्या पिकांची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
पिकांची निवड ः मातीतील आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.
पेरणीची वेळ ः मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करणे योग्य मानले जाते. मात्र, ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरशा आर्द्रतेमध्ये बियांची उगवण चांगली होते.
जमिनीमध्ये गाडण्याची योग्य वेळ ः सर्वसाधारणपणे पीक फुलोऱ्यात असताना ती गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.
हिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी ः मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कराव. जाडसर, रसाळ, देठ व पाने कुजवण्यास कमी वेळ लागतो.
मातीचा पोत व आर्द्रता हीसुद्धा महत्त्वाची आहे. हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांनी मुख्य पिकाची पेरणी करता येते.
पाण्याचा निचरा कमी असलेल्या मातीमध्ये ही खत पिके गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसानंतर पेरणी करावी.
अन्नद्रव्ये कशी उपलब्ध होतात?
पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नघटक व इतर सूक्ष्म‚ अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात.
ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक व जैविक पातळीवर अवलंबून असते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.