Crop Management : फळबागा, भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने फळबाग, भाजीपाला, चारा पिके तसेच रेशीम शेतीत पुढील कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
भाजीपाला लागवड
भाजीपाला लागवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने फळबाग, भाजीपाला, चारा पिके तसेच रेशीम शेतीत पुढील कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.

भाजीपाला लागवड
हायड्रोपोनिक तंत्राने करा भाजीपाला व्यावसायिक शेती

फळबागेचे व्‍यवस्‍थापन कसे कराल?

संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए ४ ते ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास ४०० ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावे. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास ३०० ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावे. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास ६५० ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मिरची, वांगे व भेंडी पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५ % + फेनप्रोपाथ्रीन १५ % १० मीली किंवा डायमीथोएट ३० % १३ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणाऱ्या करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन १८ .२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.

मिरची पिकावरील मर म्हणजेच ॲन्थ्रॅकनोझ रोगाच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला लागवड
शिंदेंच्या सुना बनल्या भाजीपाला बीजोत्पादनाचा कणा

चारा पीके

चारा पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा १४० किलो अमोनियम सल्फेट, १७० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १९ किलो म्यूरेट ऑफ पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे द्यावे. जुन व नोव्हेंबर महिण्यात ४ क्विंटल प्रमाणे एकूण ८ क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दतीने बोरू किंवा ढेंचा हे द्विदल पीकांची पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गाडूण टाकावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com