Cotton: कापसावरील किडी, तणांचा बंदोबस्त कसा कराल?

कापूस पिकावर रसशोषक किडी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत.
 Cotton
CottonAgrowon

कापसावर (Cotton) ढगाळ हवामान आणि दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्याच्या काही भागांत पावसाने चांगलाच जोर धरलाय. या ठिकाणी कापूस पिकावर रसशोषक किडी (Sucking Pest) आणि गुलाबी बोंडअळीचा (Pink Boll Worm) प्रादुर्भाव दिसून येत आहेत. या किडींच्या नियंत्रणासाठी (Pest Control) तसेच तण व्यवस्थापनाविषयी (Weed Management) केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढील सल्ला दिला आहेः

 Cotton
Soybean : सोयाबीन, कापूस, हळदीत उतरता कल

लागवडीनंतर ४५ दिवसांनी फुलोरा अवस्थेतील कपाशीवर २ टक्के युरियाची फवारणी करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी कपाशी पिकामध्ये मृत सर काढावी. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी कपाशी पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.


- कोळपणी आणि खुरपणी करुन पीक तणविरहीत ठेवावे. गवताळ तणांच्या नियंत्रणासाठी क्वीझॉलफॉप इथील (५ टक्के इसी) २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी पायरीथीयोबॅक सोडीयम (४ टक्के इसी) २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गवताळ आणि रुंद पानाच्या अशा दोन्ही प्रकारच्या तण नियंत्रणासाठी क्वीझॉलफॉप इथील (६ टक्के इसी) २ मिली अधिक पायरिथोओबॅक सोडीयम (४ टक्के इसी) २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 Cotton
Cotton Rate : कापूस दरातील तेजी परतणार?

बागायती संकरित कपाशीमध्ये नत्राचा पहिला हप्ता हेक्टरी ४० किलो द्यावा. त्यासाठी हेक्टरी ९० किलो युरिया द्यावा लागेल. तर कोरडवाहू कपाशीमध्ये नत्राचा हेक्टरी ३० किलो हप्ता लागतो. त्यासाठी ६५ किलो युरिया लागेल.


- १४ ते १५ दिवसाच्या पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फ्लोनीकॅमिड (५० डब्लूजी) ८० ग्रॅम किंवा डीनोटेफ्युरॉन (२० एस जी) ६० ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्लू जी) ४० ग्रॅम एकरी फवारणी करावी.


- गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येत असल्यास एकरी दोन फेरोमन सापळे लावावेत. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा फ्लोनीकॅमीड (५० टक्के डब्लू जी) ३ ग्रॅम किंवा बुप्रोफेनझीन (२५ टक्के एससी) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पांढरी माशी आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० पिवळे चिकट सापळे लावावेत. तर फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० निळे चिकट सापळे लावावेत.


- रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेला असेल तर ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम (०.१५ टक्के इसी) ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज असेल तर फ्लोनीकॅमीड (५० डब्लूजी) ८० ग्रॅम किंवा डीनोटेफ्युरॉन (२० एसजी) ६० ग्रॅम प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्लू जी) ४० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com