Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

सध्या काही भागातील वेळेवर लागवड झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
Pink Boll Worm
Pink Boll WormAgrowon

सध्या काही भागातील वेळेवर लागवड झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा (Pink Boll Worm) प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशी पीक सध्या फुले आणि पाते लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झालेले आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहे.

Pink Boll Worm
Boll Worm: बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक त्रस्त

कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.


किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. तर मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत. सापळ्यांमध्ये गॉसील्यूर म्हणजेच गुलाबी बोंडअळी चे ल्यूर वापरावे.


ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २ ते ३ या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.


५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीयुक्त कीडनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसं कराल ?


कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीडनाशकाची फवारणी करावी.

१. प्रोफेनोफॉस (५० टक्के) २ मिली प्रति लिटर पाणी किंवा
२. इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम प्रति लिटर किंवा
३. प्रोफेनोफोस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के या पूर्व मिश्रित कीडनाशकाची २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी. लक्षात घ्या हे प्रमाण साध्या फवारणी पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी तीन पट जास्त प्रमाण वापरावे.


दिलेल्या कीडनाशकामध्ये कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकाच प्रकारचे कीडनाशक फवारू नये. शिफारस केलेल्या किडनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या ०२४५२-२२९००० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Pink Boll Worm
Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com