Mango Diseases : आंबा मोहरावरील बुरशीजन्य रोगांना कसं टाळाल?

आंबा बागेत पालवी, मोहरावर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कोवळी पालवी आणि मोहराची गळ होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.
 Mango Diseases
Mango DiseasesAgrowon

सद्य स्थितित राज्यभर पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने आर्द्रता वाढून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आंबा बागेत पालवी, मोहरावर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कोवळी पालवी आणि मोहराची गळ होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. आंबा बागेतील विविध रोगाच्या नियंत्रणा विषयी मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.  

 Mango Diseases
Banana Disease : केळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचं नियंत्रण कसं कराल? | ॲग्रोवन

पालवी, मोहर आणि कळीवर करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोवळ्या पालवीवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग दिसून येतात. यामुळे मोहर तांबुस होऊन वाळू लागतो आणि मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. मोहरामध्ये फुलांच्या देठावर व उमललेल्या फुलावर काळसर विटकरी डाग दिसून येतात. यामुळे मोहर करपून जातो. याचं नियंत्रण कसं करायचं  

 Mango Diseases
कसे टाळाल कोंबड्यांतील बुरशीजन्य आजार ?

तर आंबा बागेमध्ये नियमित स्वछता ठेवावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी अॅझाक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के ईसी १० मिली किवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्लूजी २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १२टक्के अधिक मॅंकोझेब ६३ डब्लूपी १५ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी घेऊन फवारणी करावी. १ टक्का तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाने देखील हा रोग नियंत्रणात आणता येतो. एक टक्का बोर्डो मिश्रण १ किलो मोरचुद +१ किलो कळीचा चुना +१०० लिटर पाणी घेऊन तयार करावं. 

आंब्याच्या पालवीवर आणि मोहरावर येणारा दुसरा महत्वाचा रोग म्हणजे भुरी. भुरी हा बुरशिजन्य रोग आहे. या रोगामुळे मोहर आणि छोटी फळे यांची गळ होऊन नुकसान होते. मोहरावर पांढरी बुरशी येते. फुले उमलत नाहीत, मोहर गळू लागतो. पानाच्या दोन्ही बाजूवर अनियमित राखाडी रंगाचे ठिपके दिसून येतात. पुर्ण वर्षभर बुरशी सावलीत रोगग्रस्त पाने, फुले इत्यादीवर सुप्त अवस्थेत राहते आणि जानेवारी ते मार्च या काळात अनुकूल वातावरण मिळताच प्रादुर्भाव करते. वाढती आर्द्रता आणि तापमानात होणारे बदल या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल ठरतात. 

याचं नियंत्रण कसं कराल ? तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी कार्बेंन्डाझिम ४६.२७ टक्के एससी १० ग्रॅम किवा डिनोकॅप ४८ टक्के ईसी ५ मिली किवा हेक्झाकोनॅझोल ५ टक्के ईसी २० मिली किंवा पेणाकोनाजोल १० टक्के ईसी ५ मीली किवा कार्बेंडझिम १२ टक्के अधिक मॅंकोझेब ६३ टक्के डब्लुपि १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. वरील सर्व कीडनाशकांना लेबल क्लेम आहेत. प्रभावी नियंत्रणासाठी कीडनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com