
पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक किंवा तुषार पद्धतीने पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते.
खड्डा खोदून तयार केलेले शेततळे आणि नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेले शेततळे (Farmpond) असे शेततळ्याचे दोन प्रकार आहेत. शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
आपत्कालीन स्थितीमध्ये पिकास पाण्याची उपलब्धता होते. रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) सुरुवातीस शेततळ्यात पाणी साठविले, तर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामातील मर्यादीत क्षेत्रात एखादे पीक घेता येते.
शेततळ्यासाठी जागेची निवड
पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी, काळी चिकन मातीचे प्रमाण जास्त असलेली जमीन शेततळे उभारणीसाठी उपयुक्त असते.
साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी.
मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळ्यास निवडू नये.
शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते.
खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी. तसेच सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्रित येईल असे नियोजन करावे.
पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. अशा जागेतील तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.