कसे कराल स्पोडोप्टेरा पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन?

स्पोडोप्टेरा कीड कोबी, फ्लॉवर, भेंडी, कपाशी, एरंडी, बटाटा, झेंडू, शर्कराकंद इत्यादी पिकांवर उपजीविका करते.
Spodoptera Pest
Spodoptera PestAgrowon

सोयाबीन (Soybean) पिका खालील क्षेत्र वाढल्याने स्पोडोप्टेरा (Spodoptera) या बहुपीकभक्षी पाने खाणाऱ्या अळीचा उद्रेक होऊन बरेच नुकसान होते. ही कीड कोबी, फ्लॉवर, भेंडी, कपाशी, एरंडी, बटाटा, झेंडू, शर्कराकंद इत्यादी पिकांवर उपजीविका करते.

Spodoptera Pest
राज्यात ‘स्पोडोप्टेरा’च्या नव्या जातीचा धोका

कीड उद्रेकाची प्रमुख कारणे

किडीला पोषक हवामान म्हणजे कमी ते मध्यम पावसानंतरचा कोरडा काळ.

तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास असणे.

रासायनिक कीडनाशकांचा सतत वापर.

सुरुवातीच्या अवस्थेत शेतात कीडीचे निरीक्षण न करणे.

कीड रात्री सक्रिय असल्याबद्दल व तिच्या जीवन क्रमाबद्दल अज्ञान असणे.

सतत यजमान पिकाची उपलब्धता.

Spodoptera Pest
‘रोहयो’मधून होणारी फळबाग लागवड ठप्प

मादी पतंग शेतात मोजक्या झाडांच्या पानाखाली पुंजुक्यात २५० ते ३०० अंडी घालते. अंड्यातून तीन ते चार दिवसात अळ्या बाहेर पडतात. त्याच पानावर चार ते सात दिवस समूहात पानाचे हरितद्रव्य खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. नंतर तीन ते चार दिवसाच्या अंतराने या आळ्या छोटे - छोटे गट करून सर्व शेतात पसरतात. मोठ्या झाडावर अतिशय खादाड होऊन आतोनात नुकसान करतात. २५ टक्क्यांपेक्षा जास्त पाने खाल्ल्याने पिकाची वाढ व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. अशा अळ्या दिवसा झाडांच्या फांद्या, पालापाचोळा व गवतात लपतात व रात्री अधाशासारख्या पाने खातात. दोन ते तीन आठवड्यात जमिनीत शिरून कोषावस्थेत जातात. कोषातून सात ते दहा दिवसात नर, मादी पतंग बाहेर पडून त्यांचे मिलन झाल्यावर मादी अंडी घालण्यासाठी ३० ते ५० दिवसाचे उपलब्ध पीक शोधते. उद्रेकाच्या काळात अळ्या एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरतात.

कीड व्यवस्थापनाचे उपाय

- पिकाचे नियमित निरीक्षण करावे. शेतातील आठवड्यातून दोनदा जाळीदार पाने शोधून ते आळ्या सहित केरोसीनयुक्त पाण्यात ५० मिली प्रतिलिटर पाणी मिसळून बुडवावेत किंवा जाळावेत. त्यामुळे अळ्या छोट्या असताना व झुंडीत असतानाच मेल्यामुळे पिकांचे फारसे नुकसान होत नाही.

- शेतात पाच ते दहा एरंडीची झाडे सापळा पिक म्हणून बांधाजवळ लावल्याने त्यावरील कीडग्रस्त जाळीदार मोठी पाने लांबूनच ओळखता येतात. मुख्य पिकावरील अशी पाने आळ्सयाहित नष्ट करावीत.

-पिकाची पाने खाल्लेली आढळल्यास झाडाच्या फांद्यावर, पालापाचोळ्यात व गवतात आळ्या शोधाव्यात. सुमारे १५ टक्के झाडाची पाने खाल्लेली दिसल्यास एस एल एन पी व्ही जिवाणू युक्त जैविक कीटकनाशकाची दहा मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे तीन ते चार दिवसात रोगाची साथ होऊन अळ्या मरतात.

- पावसाळ्यात नोमुरिया या बुरशीमुळे अळ्यांमध्ये साथीचा रोग निर्माण होऊन अळ्या हिरवट, राखाडी होऊन मरतात. मेलेल्या अळ्यांचे अवशेष पानावर व जमिनीवर आढळतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com