
शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये (Zero Tillage Technology) अगोदर उगवलेली हिरवी तणे Weed किंवा पिकांचे अवशेष जागेवरच (जमीन न नांगरता) मारणे/ कुजवणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडक तणनाशके Weedicides किंवा बिन निवडक तणनाशकांचा वापर करून तणांचे नियंत्रण करणे शक्य आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या शिफारसीप्रमाणे तण व्यवस्थापनाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अ. तणांचे वर्गीकरण
१) तणांच्या जीवनमानानुसार
अ) वार्षिक तणे - एका वर्षात जीवनक्रम पूर्ण करणारी
खरीप : कुंजरू, आघाडा, दुधी
रबी : चंदनबटवा, राणएरंडी
ब) द्विवार्षिक - दोन वर्षात जीवनक्रम पूर्ण करणारी
उदा. जंगली गाजर इ.
क) बहुवार्षिक तणे - दोन पेक्षा जास्त वर्षाचा जीवन काळ असणारी
उदा. हराळी, घाणेरी इ.
२) पानांच्या रुंदीनुसार वर्गीकरण
अ) लांब पानांची तणे (एकदल/गवत वर्गीय) : उदा. शिप्पी, लोना, हरळी
ब) रुंद पानांची तणे (द्विदल/बिनगवत वर्गीय): उदा. दीपमाळ, कुंजरू, दुधी इ.
३) विविध प्रकारची तणे
लव्हाळा, हराळी, भरड, लोणा, कुर्डू, शिप्पी, लव्हाळा, आघाडा, दिपमाळ, मोठी दुधी, गोखरू, कुंजरू, छोटी दुधी, पिवळा धोतरा, हजारदाणी, रानएरंडी, रेशीमकाटा पेटारी, रानपोपटी, चांदवेल, खांडखुळी, माठ, घोळ, पांढरीफुली रानताग, चंदन बटवा, आमुशी, उंदीरकानी ,जखमजोडी, तरोटा, लाजाळू, गाजरगवत, घाणेरी.
ब) पीक- तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी
साधारणत: पीक वाढीच्या सुरुवातीचा १/३ कालावधी
मूग, उडीद - १५ ते ३०
बाजरी - १५ ते ३५
ज्वारी, सुर्यफुल, भात, सोयाबीन, भुईमुग - १५ ते ४५
कापूस, तूर - २० ते ६०
ऊस - २० ते १२०
क) रासायनिक पद्धतीने तणांचे नियंत्रण
अ) तणनाशकांचे प्रकार : तण नष्ट करणाच्या गुणधर्मानुसार/ वापरानुसार..
⦁ निवडक तणनाशके
उदा- अॅट्राझीन, पेन्डीमिथॅलीन
⦁ बिन निवडक तणनाशके
उदा- पॅराक्वाट, ग्लायफोसेट
अ) तणनाशके वापरण्याच्या वेळेनुसार
⦁ पीक पेरणीपूर्वी वापरावयाची तणनाशके: उदा-फ्लुक्लोरॅलीन
⦁ पीक व तणे उगवण्यापूर्वी वापरावयाची तणनाशके (उगवणपूर्व): उदा- अॅट्राझीन ५० डब्ल्यु पी
आ) तणनाशकांच्या तणावरील क्रियेनुसार
⦁ स्पर्शजन्य तणनाशके (Contact) : जेवढ्या भागावर फवारणी झाली तेवढाच भाग नष्ट करते.
उदा- पॅराक्वाट
⦁ आंतरप्रवाही तणनाशके (Systemic/Translocated) : फवारणी नंतर तणांच्या शरीर क्रियेमध्ये प्रवेश करते. उदा- अॅट्राझीन, ग्लायफोसेट
ई) हेक्टरी लागणारे तणनाशक (किलो) = हेक्टरी तणनाशकाचे प्रमाण (क्रियाशील घटक किलो) भागीले तणनाशकातील क्रियाशील घटक गुनीले १००
------------------
स्त्रोत ः शून्य मशागत तंत्र पुस्तिका ः विजय कोळेकर, कृषि विद्यावेत्ता, पोकरा, मुंबई
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.