Banana Cultivation : सुधारित पद्धतीने केळी लागवड कशी करायची?

कांदे बाग केळीची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात केली जाते. कांदे बाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असते, परंतु बाजारभाव मात्र चांगले मिळतात.
Banana Cultivation
Banana Cultivation Agrowon

कांदे बाग केळीची लागवड (Banana Cultivation) ऑक्‍टोबर महिन्यात केली जाते. कांदे बाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असते, परंतु बाजारभाव (Market Rate) मात्र चांगले मिळतात. लागवडीपासून योग्य व्यवस्थापन ठेवले तर चांगले उत्पादन मिळते. सुधारित पद्धतीने केळी लागवड कशी करावी? याविषय़ी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने दिलेली माहिती पाहू.

ऑक्‍टोबर महिन्यात लागवड केलेल्या केळी पिकाचे मे ते जुलै या कालावधीत केळफूल बाहेर पडते, तर ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत केळी काढणीस तयार होते. ऑक्‍टोबर लागवडीचे वैशिष्ट्य असे, की या पिकाची वाढ सावकाश होत असली तरी ती पूर्ण होते. जून लागवडीपेक्षा ऑक्‍टोबर लागवडीची फळे अधिक काळ टिकतात.

Banana Cultivation
Banana Cultivation : खानदेशात कांदेबाग केळी लागवड रखडली

जमीन

मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची खोली ६० सें. मी. पर्यंत असावी. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ दरम्यान असावा. माती परीक्षण करून घ्यावे. 

क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये. 

श्रीमंती व ग्रॅंड नैन या वाणांची निवड करावी.

लागवडीचे अंतर

केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन ओळींचे अंतर १.५ मीटर बाय १.५ मीटर ठेवावे. हेक्‍टरी ४,४४४ झाडे बसतात.

Banana Cultivation
Jowar Cultivation : पौष्टिक ज्वारीची रब्बीत करुया लागवड

कंद निवड

केळी लागवडीसाठी कंद अथवा मुनवे निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झालेले कंद वापरू नयेत. 

लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंदाचा आकार आणि वजन योग्य असणे महत्त्वाचे आहे. मुनव्यांचे वय ३ ते ४ महिने असावे. कंदाचे वनज ४५० ते ७५० गॅम असावे. 

कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदांवर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावेत. 

लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपे एकसारख्या वाढीची ३० ते ४५ सें. मी. उंचीची आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत.

Banana Cultivation
Tur cultivation: अर्धरब्बी तूर लागवडीचे तंत्र जाणून घ्या

खत व्यवस्थापन

सेंद्रिय खत - शेणखत - १० किलो/ झाड किंवा गांडूळ खत - ५ किलो/ झाड 

जैविक खत - लागवडीच्या वेळी ऍझोस्पिरिलम - २५ ग्रॅम/ झाड आणि पीएसबी -२५ ग्रॅम/ झाड, 

निंबोळी पेंड - ऑक्‍टोबर लागवडीच्या झाडांना डिसेंबर, जानेवारी महिन्यांत थंडीच्या दिवसांत प्रति झाड २०० ते ४०० ग्रॅम निंबोळी पेंड दिल्यास जमिनीत उबदारपणा येतो. 

रासायनिक खते - प्रति झाडास २०० ग्रॅम नत्र, ४० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा खोली घेऊन खते द्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com