आडसाली ऊस लागवडीचे तंत्र माहिती आहे का ?

बऱ्याच भागात आता पावसाने उघडीप दिल्यामुळे आडसाली ऊस लागवडीला वेग आला आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली होती. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पावसातच ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरू केली आहे. दरम्यान बऱ्याच भागात आता पावसाने उघडीप दिल्यामुळे आडसाली ऊस लागवडीला वेग आला आहे. ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शास्त्रीय लागवड पद्धतीचा अवलंब व कारखाना स्तरावरील नियोजन या बाबी समन्वयाने करणे आवश्यक आहे. आडसाली हंगामातील (जुलै - ऑगस्ट) ऊस पीक अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते तसेच अडसालीच्या पीक वाढीच्या १६ ते १८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्यामुळे सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. आजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस पिकाखालील क्षेत्र वाढीला मर्यादा आहे. त्या ऐवजी हेक्टरी उत्पादकता वाढविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते.

यामुळे होते उत्पादकता कमी
- हंगामनिहाय क्षेत्र व पक्वतेनुसार ऊस तोडणीचा अभाव.
- शुद्ध व निरोगी ऊस बेण्यासाठी त्रिस्तरीय बेणे मळ्याचा अभाव.
- पाण्याचा व रासायनिक खतांचा असंतुलित वापर.
- योग्य पिकांद्वारे फेरपालटीचा अभाव. अयोग्य अंतर पीक पद्धती.
- एकात्मिक कीड, रोग व तण नियंत्रणाचा अभाव.
- खोडवा पिकांकडे दुर्लक्ष.
- सुधारित शेती अवजारांचा कमी वापर.
- आकस्मिक नैसर्गिक आपत्ती

Sugarcane Cultivation
ऊस तोडणीसाठी यंत्रमानवाचा वापर ?
Sugarcane Cultivation
तंत्र आडसाली ऊस लागवडीचे...

उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्र ?
जमीन व पूर्वमशागत

मध्यम ते भारी ४५ ते ६० सेंटिमीटर किंवा त्याहून खोल आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. खोल नांगरटी नंतर कुळवाच्या उभ्या - आडव्या पाळ्या देऊन सपाटीकरण करावे. रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत १२० सेंटिमीटर व मध्यम जमिनीत १०० सेमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान करावी. पट्टा पद्धतीसाठी २.५ ते ५ किंवा ३ ते ६ फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टीलर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर १२० सेमी ठेवावे.

Sugarcane Cultivation
तूर, कापूस एकत्र का घेऊ नये ?

सुधारित जाती आणि लागवड
फुले २६५, को ८६०३२ आणि को व्हीएसआय ९८०५ यापैकी वाणाची निवड करावी.
तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरताना दोन टिपरी मधील अंतर १५ ते ३० सेंमी ठेवावे. ओल्या पद्धतीने लागण चालेल मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी एक डोळ्यांची तीस हजार तर दोन डोळ्यांची पंचवीस हजार टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेला रोपांची लागवड करताना चार फुट अंतरावर सऱ्या काढून दोन रोपांतील अंतर दोन फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी १३.५ ते १४ हजार रोपे लागतील. लागवडीपूर्वी बेण्याला बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Sugarcane Cultivation
Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

खत व्यवस्थापन

लावणीच्या वेळी नत्र ४० किलो, स्फुरद ८५ किलो आणि पालाश ८५ किलो प्रती हेक्टरी खतांची मात्रा द्यावी. लावणी नंतर सहा ते आठ आठवड्यांनी नत्राचा १६० किलो याप्रमाणे दुसरा हप्ता द्यावा. लावणी नंतर बारा ते सोळा आठवड्यांनी नत्राचा तिसरा हप्ता हेक्टरी ४० किलो याप्रमाणे द्यावा.
युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठ्या बांधणी पर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान वीस हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यात नत्र खताची मात्रा विभागून ठिबक द्वारे दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लावणीचे वेळी व मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून द्यावीत. रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खाते मुळाच्या सानिध्यात द्यावीत. युरिया बरोबर निंबोळी पेंडीचा १ ; ६ या प्रमाणात वापर करावा.

Sugarcane Cultivation
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन

आंतरपिके कोणती घ्यावीत ?
खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात. भुईमूग हे आंतरपीक घेताना फुले प्रगती, एसपी ११, फुले व्यास, फुले उनप, टॅग २४, टी.जी २६ या जाती वापराव्यात.
लागवडीनंतर दोन-तीन महिन्यांनी बाळ बांधणी करावी. लागवडीनंतर साडेचार ते पाच महिन्यांनी पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवूण अंतर मशागत करावी. खतांची मात्रा देऊन रिजरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी. सिंचनासाठी सऱ्या व वरंबे सावरून घ्यावेत.

आंतरमशागत
कोळपणी किंवा खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे. लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सेंमी खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सेंमी खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये.

उत्पादन
तोडणी १४ ते १६ महिन्यानंतर करावी प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचे हेक्टरी २०० ते २५० टनापर्यंत ऊस उत्पादन मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com