Sulphur Deficiency : पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची?

गंधक हे पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्नघटक आहे. संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य गणले जाऊ लागले आहे.
Sulphur Deficiency
Sulphur DeficiencyAgrowon

गंधक (Sulphur) हे पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्नघटक आहे. संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य गणले जाऊ लागले आहे.  कारण गंधक पिकातील हरितद्रव्यनिर्मितीची आणि प्रकाश संश्लेषणाची (Photosynthesis) प्रक्रिया वाढविण्यास मदत करते याशिवाय गंधक बीज निर्मिती (Seed Production) प्रक्रियेमध्ये मदत करते. उच्च प्रतीच्या शेतमालाची निर्मिती होण्याकरिता मदत करते. वनस्पतीमधील पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविते. सध्या खरीपातील विविध पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. पिकामध्ये गंधक कमतरतेची लक्षणे साधारणतः पिकाच्या काढणीच्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे जमिनीतील गंधकाची कमतरता ओळखून रब्बी हंगामातील पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी प्रयत्न करता येतील.  

Sulphur Deficiency
Soil Health : गंधक जमिनीत कोणत्या स्वरुपात अढळते?

कडधान्य वर्गीय पिकाच्या मुळावर असणाऱ्या नत्र स्थीरीकरण करणाऱ्या गाठीच्या संखेत घट होते. त्यामुळे नत्र स्थीरीकरणाचे प्रमाण कमी होते. 

फळे पूर्णपणे परिपक्व होत नाहीत. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि हरित द्रव्याची निर्मिती मंदावलेली दिसते.

रुंद पाने असलेली पिकाची पाने चुरडलेली दिसतात. 

गळित धान्यातील दाण्याचा आकार, तजेलदारपणा त्यातील तेलाचे प्रमाण कमी झालेले दिसते.

फळातील एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण कमी होते आणि नत्र देऊनही हिरवी होत नाहीत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com