Coconut Chips : नारळापासून चीप्स कसे बनवाल?

नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने त्याला "कल्पवृक्ष' म्हणतात. खोबऱ्यावर प्रक्रिया केल्यावर डेसिकेटेड खोबरे , नारळ मलई, दूध, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन अशी व्यापारी मूल्य असणारी उत्पादने तयार करता येतात.
Coconut Chips
Coconut ChipsAgrowon

नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने त्याला "कल्पवृक्ष' म्हणतात. खोबऱ्यावर प्रक्रिया केल्यावर डेसिकेटेड खोबरे (Descicated Coconut) , नारळ मलई, दूध, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन (Activated Carbon) अशी व्यापारी मूल्य असणारी उत्पादने तयार करता येतात.

या उत्पादनातून निश्‍चित लघु उद्योगाची उभारणी करता येणे शक्‍य आहे. याशिवाय नारळाचा उपयोग करून नारळ चिप्स, व्हिनेगार, खोबरेल तेल, खोबरे पूड, नारळाच्या दुधाचे क्रीम, पॅकिंग केलेले नारळ पाणी, करवंटी कोळसा, करवंटी पूड, नारळ दुधाची पावडर आणि व्हिनेगर निर्मिती करता येते.

नारळाचे फळ सोलणी यंत्राने सोलून घ्यावे.सोललेल्या नारळ फळाचे दोन भाग करावेत.नारळातील खोबरे स्कूपरच्या साह्याने करवंटीपासून काढावे.

ते स्वच्छ पाण्याने धुऊन नारळावरील असलेली तपकिरी रंगाची साल पिलरच्या मदतीने अलगद बाजूला काढावी.

नारळ पांढरेशुभ्र झाल्याची खात्री करून घ्यावी.०.०५ टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट मिश्रित उकळणाऱ्या पाण्यामध्ये १५ मिनिटांपर्यंत खोबऱ्याला उकळून घ्यावे.

यानंतर खोबरे पाण्याच्या बाहेर काढून पाण्याचा निचरा होऊ द्यावा. स्लायसरने खोबऱ्याचे चिप्स म्हणजेच काप करावेत. साखरेच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत.

Coconut Chips
Soybean Products : सोयाबीनपासून पौष्टिक पदार्थ कसे बनवाल ?

नारळाचे चिप्स कसे बनवावेत?

- नारळाचे गोड चिप्स बनविण्यासाठी साखर व पाणी १:१ या प्रमाणात घेऊन साखर पाण्यामध्ये विरघळपर्यंत मिश्रण गरम करावे. त्या मिश्रणात व्हॅनिला फ्लेवरचे ४ ते ५ थेंब टाकून चिप्स ४५ मिनिटे बुडवून ठेवावेत.

- नारळाचे खारे काप बनविण्यासाठी २ टक्के मिठाचे द्रावण ( १ लिटर पाण्यामध्ये २० ग्रॅम मीठ)बनवावे. या पाण्यामध्ये चीप्स ४५ मिनिटे भिजवून ठेवावेत. त्यात ४ ते ५ थेंब मसाल्याचे द्रावण टाकावे.

Coconut Chips
Dried Fig : सुके अंजीर कसं बनवाल ?

- चीप्समधील पाणी चाळणीने निथळून वाळवणी यंत्रामध्ये व्यवस्थित पसरुन चिप्स सुकविण्यासाठी ठेवावेत.

- चीप्स कुरकुरीत होण्यासाठी ६० अंश सेल्सिअस ते ६५ अंश सेल्सिअस तापमानात ४ ते ५ तास लागतात. काप पसरुन ठेवलेल्या भांड्याला चिकटू नयेत म्हणून एका तासानंतर उलटावेत.

- भाजणीकरिता तापमान ९० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे आणि चीप्सला हलका सोनेरी रंग येईपर्यंत सुकवावे.

- चिप्स वाळवणी यंत्रातून बाहेर काढावेत आणि थंड होण्यासाठी ठेवावेत.तयार झालेल्या चिप्स शेवटी पॅक करावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com