banana products
banana productsAgrowon

Banana Processing : केळीपासून चिप्स, पावडर कशी बनवाल?

केळीपासून चिप्स, पावडर, जॅम, प्युरी, ज्यूस तसंच बीस्कीटेही बनविता येतात.

केळी हे बारमाही उपलब्ध असणार फळ आहे. केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील कॅल्शिअम (Calcium) व फॉस्फरस (Phosphorus) यांचे प्रमाण टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे.

त्यामुळे स्नायू, मांसपेशी बळकट होऊन शरीर कार्यक्षम बनवते. तसेच आरोग्यवर्धक, बलदायक आहे. केळीपासून चिप्स (Banana Chips), पावडर, जॅम, प्युरी, ज्यूस तसंच बीस्कीटेही बनविता येतात. 

banana products
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडर

चिप्स

पूर्ण वाढ झालेली १० टक्के पक्व म्हणजेच कच्ची केळी निवडावीत. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत.

स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. काप काळसर पडून नयेत व ते पांढरे शुभ्र होण्यासाठी एक किलो चिप्ससाठी ०.१ टक्के सायट्रिक ॲसिड किंवा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत.

चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस एवढे ठेवावे.

जास्त दिवस टिकविण्यासाठी ‘हाय डेन्सिटी पॉलिथीन’ पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

banana products
Amla Processing : आवळा कॅन्डी कशी करावी?

भुकटी

पावडर बनविण्यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुवावी. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साहाय्याने लगदा करून घ्यावा. 

केळीच्या गराच्या लगद्याची पावडर स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायरच्या साहाय्याने करतात.

तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात.

लहान मुलांचा आहार, बिस्किटे तसेच आइस्क्रीम मध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो. केळी भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com