Papaya Processong : पपईपासून टुटीफ्रुटी, मार्मालेड कशी बनवाल?

पपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या मार्केटमध्‍ये माल पाठविताना फार काळ टिकत नाही. त्‍यामुळे पपईवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
Papaya Processong
Papaya ProcessongAgrowon

पपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या मार्केटमध्‍ये माल पाठविताना फार काळ टिकत नाही. त्‍यामुळे पपईवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. हे प्रक्रियायुक्‍त पदार्थ वर्षभर टिकून राहतात. पपईपासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन असे पदार्थ बनवून ये निर्यातदेखील करता येतात.

चवीला गोड शरीराला पोषक आणि त्‍वचेचे आरोग्‍य सुधारणारे फळ म्‍हणजे पपई. पपई शरीराला गरम असल्‍याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे.

पपईमध्‍ये जीवनसत्त्व सी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्‍याने रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये कोलेस्‍टेरॉल साचून राहत नाही व प्रमाण कमी होते.

एका मध्‍यम आकाराच्‍या पपईमध्‍ये १२० कॅलरीज असतात. पपईतील डायटरी फायबर मुळे वेळी अवेळी लागणा-या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

पचनक्रिया चांगली राहते आणि पचनशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. शरीरातील प्रथिनांच्‍या पचनासाठी पपईतील पेप्‍सीन हा घटक मदत करतो.

जीवनसत्त्व ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्‍य चांगले राहते.

अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट शरीरातील फ्री रॅडीकल्‍स आणि आतड्यांच्‍या कर्करोगांपासून दूर ठेवते.

अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व इ व सी मुळे चेह-यावर चमक येते; तसेच सुरकुत्‍या कमी होतात. त्‍यामुळे पपईचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्‍ये केला जातो. 

Papaya Processong
Papaya Processing : कच्च्या पपईपासून टुटीफ्रुटी कशी बनवायची?

मार्मालेड

जाम प्रमाणेच पपईचे मार्मालेड ही बनविले जाते. फरक एवढाच की, मार्मालेडमध्‍ये संत्र्यांच्‍या सालीचे २ ते ३ से.मी. लांबीचे पातळ तुकडे टाकतात.

संत्र्याच्‍या सालीचे तुकडे प्रथम एका भांड्यात २ ते ३ वेळा पाणी बदलून उकळून घ्‍यावे, त्‍यामुळे सालीतील कडवटपणा कमी होतो व साली मऊ बनतात.

पपईचा गर, साखर व सायट्रीक अॅसिड एकत्रित करून हे मिश्रण मंद अग्‍नीवर ठेवलेले असताना त्‍यात समप्रमाणात संत्र्याच्‍या सालीचे तुकडे घालावेत.

थंड झाल्‍यावर मार्मालेड निर्जंतुक केलेल्‍या बाटलीत भरावे.

संत्र्याच्‍या सालीतील पोषक घटक मार्मालेड या पदार्थामध्‍ये येतात, त्‍यामुळे मार्मालेड या पदार्थास परदेशात भरपूर मागणी आहे.

Papaya Processong
Soybean Products : सोयाबीनपासून पौष्टिक पदार्थ कसे बनवाल ?

टुटीफ्रुटी

१ किलो कच्या पपईच्‍या गराचे चौकोनी टुकडे कापून घ्‍यावेत.

अर्धा लिटर पाण्‍यामध्‍ये ४ टी स्‍पून चुना मिसळून त्‍यामध्‍ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावे.

तुकडे दुस-या पाण्‍यात २ ते ३ वेळा धुवून पांढ-या मलमलच्‍या कापडात बांधून ३ ते ५ मिनिटे वाफवून घ्‍यावे. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्‍यात ठेवावे.

एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्‍यावा व त्‍यामध्‍ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावे.

तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्‍यामध्‍ये सायट्रिक अॅसिड मिसळावे.

पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्‍यावर त्‍यामध्‍ये तुकडे व आवडीनुसार रंग घालुन मिसळावे व हे मिश्रण २ ते ३ दिवस ठेवावे.

तुकड्यांमध्‍ये पाक चांगला शिरल्‍यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरुन ठेवावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com