Poultry Diseases: कोंबड्यांतील रोगप्रसार कसा रोखायचा?

कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून होणारे नुकसान टाळता येते.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon

कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून होणारे नुकसान टाळता येते.

कोंबड्यांतील रोगप्रसार (Poultry Diseases) टाळण्यासाठी डास, गोचीड, पिसवा, माश्‍या यांचा प्रतिबंध करावा. शेडच्या आजूबाजूला पाणी साठून दलदल होणार नाही, शेड कोरडे राहील याची काळजी घ्यावी. शेडमध्ये

पक्षी, उंदीर येऊ नयेत म्हणून उपाययोजना करावी. यासाठी कीटकनाशक फवारणी, माश्‍यांसाठी ट्रॅप या बाबी उपयोगी पडतात.  

खाद्य-पाण्याची भांडी, खाद्याची पोती, पायातील चपला, कपडे, अंड्याचे ट्रे, कोंबड्यांचे पिंजरे इत्यादींमार्फत रोगप्रसार होऊ शकतो.

कोंबड्यांमधील रोग प्रसार कसा रोखायचा याविषयी उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुयात.  

Poultry Diseases
Poultry Diseases : कोंबड्यांतील रोग प्रसाराची कारणे जाणून घ्या

रोगप्रसार टाळण्यासाठी स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे. ॲप्रन, हातमोजे यांचा वापर करावा. शेडजवळ वाहनं आणण्यास प्रतिबंध करावा.

जुने कुक्कुट प्रक्षेत्र आणि ज्या ठिकाणी स्वच्छता दुर्लक्षित केली जाते अशा ठिकाणी रोगांचे जीवजंतू सतत असतात.

कमी वयाची पिल्ले रोगांना लवकर बळी पडतात. यामध्ये इन्फेक्‍शियस बरसल डिसीज म्हणजेच गंबोरो, सालमोनेलोसीस, मरेक्‍स आजार,  ई कोलाय इन्फेक्‍शन, कॉक्‍सीडीओसीस यांचा समावेश होतो. 

प्रक्षेत्रावरील प्रभावी स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यक्रम रोगप्रसार टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. कोंबड्यांचा एकमेकांसोबत येणारा संपर्क हे रोग प्रादुर्भाव वाढवण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. 

Poultry Diseases
Poultry Diseases : कोंबड्यांमध्ये या मार्गाने होतो रोगप्रसार

आजारी कोंबडी दुसऱ्या चांगल्या कोंबडीच्या संपर्कात आली की आजारी कोंबडीचा स्राव, लाळ, मूत्र, विष्ठा तसंच आजारी कोंबड्यांच्या शरीरावर असलेले घाव, स्नायू यांच्याद्वारे रोगप्रसार होतो किंवा जखमा, डोळ्यांचा पडदा, श्‍लेषमल पटल याद्वारेही रोगप्रसार होऊ शकतो.

काही आजारांचा एकमेकांना घासणे, चावा घेणे, नाकाशी संपर्क याद्वारे प्रसार होऊ शकतो.

रोगप्रसार टाळण्यासाठी प्रक्षेत्रावर आजारी कोंबड्या आणि निरोगी कोंबड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावं. 

आजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी, खाद्य, पाणी व कामगार हे स्वतंत्र असावेत.

आजारी कोंबड्यांच्या वस्तू, कामगार यांचा चांगल्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी वापर करू नये. शेड नेहमी स्वच्छ व कोरडं ठेवावं.

मोठ्या कोंबड्या जीवजंतूंच्या वाहक म्हणून कार्यरत असतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये सर्वसाधारणपणे जीवजंतू पचनसंस्थेमध्ये स्थानबद्ध असतात.

ज्या वेळी त्यांच्या शरीरावर ताण येतो त्या वेळी कोंबड्या रोगाची लक्षणे दाखवतात. अशा कोंबड्या इतर निरोगी कोंबड्यांच्या संपर्कात येऊन रोगप्रसार होतो.

यामध्ये मायकोप्लाझमोसीस फाऊल टायफॉइड, कोरायझा, सालमोनेलोसीस, इन्फेक्‍शियस ब्रॉंकायटिस, रानीखेत आजार, ऊवा, पिसवा, गोचिड प्रादुर्भाव इत्यादी आजारांचा समावेश होतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com