Tur Wilt Disease : तुरीवरिल मर रोगाला कसे रोखाल?

मराठवाडा विभागात काही ठिकाणी तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.
Tur Disease Management
Tur Disease Management Agrowon

मराठवाडा विभागात काही ठिकाणी तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो. हा रोग फ्युजारियम उडम बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते. या राोगाची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद दौंडी यांनी दिलेली माहिती पाहूया.

Tur Disease Management
अकोट तालुक्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

लक्षणे काय आहेत?

झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. प्रथम झाडाची शेंड्याकडील पाने कोमेजतात. कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवरून जमिनीपासून खोडा पर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे रोग ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. 

Tur Disease Management
Chana Wilt : हरभऱ्याला बसतोय मर रोगाचा फटका

नियंत्रण कसे करावे ?

पेरणीसाठी रोगप्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.  बीएसएमआर - ७३६, बीएसएमआर - ८५३ आणि विपुला, राजेश्वरी हे वाण मर रोग प्रतिकारक्षम आहेत. आयसीपी २३७६  हा वाण नर्सरीमध्ये मर रोगाला १०० % बळी पडणारा आहे त्यामुळे या वाणाची पेरणी करू नये. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला १ ते १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक २ ते २.५ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. यानंतर शिफारशीत बियाण्याला ६ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात या पिकाची लागवड पाच ते सहा वर्षांपर्यंत करू नये. शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावी. तूर लागवडीच्या क्षेत्रात तृणधान्यांसारखी फेरपालटीची पिके घ्यावीत. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनच प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे लक्षात ठेवा पिकाली पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला शिफारशीनूसार बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया जरुर करावी. तरच या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com