Crop Management : पावसाच्या खंडात पिकातील ओलावा कसा टिकवाल?

काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, तेथे पिकांसाठी पावसाचा खंड काळात योग्य उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

बदलत्या वातावरणामुळे सर्वसाधारणपणे पाऊस (Rain) नेहमीपेक्षा उशिरा सुरू होतो किंवा पाऊस नेहमीपेक्षा लवकर बंद होतो. पाऊस वेळेवर सुरू होणे, मध्येच मोठा खंड पडणे आणि अतिवृष्टी होणे अशाप्रकारे कोणतीही एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या अनेक ठिकाणी पावसाचा खंड आढळून येत आहे. काही ठिकाणी वेळेवर पेरणी झाली त्याठिकाणी पिकांची वाढ समाधानकारक आहे. परंतु, पावसाच्या खंडामुळे पिकांचे व्यवस्थापन योग्य रितीने करणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, तेथे पिकांसाठी पावसाचा खंड काळात योग्य उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक आहे. पावसात खंड पडलेला असताना पीकामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

Organic Farming
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचे १ ते २ खंड आढळून येतात. हे पावसाचे खंड बऱ्याचवेळा जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आढळून येतात. हा पावसाचा अनियमितपणा किंवा खंड पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्वतेच्या काळातसुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.


या काळात विहीर किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.


पिकांच्या अवस्थेनुसार हलक्‍या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी. कोळपणीमुळे भेगा बुजविल्या जातात. याद्वारे ओलावा साठवून ठेवण्यात मदत होते.


बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओल उडून जाते. जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी शेतातील निरोपयोगी काडी, कचरा, धसकटे, आणि गवताचा वापर पिकाच्या दोन ओळीमध्ये करावा.आच्छादनामुळे २५ ते ३० मीमी ओलाव्याची बचत होते. उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.

जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पानांचे तापमान वाढते. पिके कोमेजतात. पानाच्या पृष्ठभागावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. पानातील अण्णांश तयार करण्याची क्रिया मंदावते. अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास पिकाच्या पानांतील क्रिया गतिमान होण्यास मदत होते आणि पिके जमिनीतील ओलावा शोषणास सुरुवात करतात.


उष्णतेमुळे पानाच्या पृष्ठभागावरुन होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलीन किंवा खडू पावडरचा ८ टक्के फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते.


उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यासाठी पिकांची स्पर्धा वाढते आणि ओलावा कमी पडल्यास सर्व पिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी विशेषतः पिकाच्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी एकास तीन प्रमाणात रोपांची संख्या कमी करावी. पिकाची खालील पाने कमी करावीत आणि वरील चार ते पाच पाने ठेवावीत त्यामुळे पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होते.

Organic Farming
Cotton : कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com