कशी टिकवाल जमिनीची सुपिकता?

जमिनीचा घटता कस ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण घटत चालले आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
Fertilizer Application
Fertilizer ApplicationAgrowon

जमिनीच्या सुपिकतेसाठी जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन (Crop Management) , योग्य वेळी पूर्वमशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Integrated Nutrient Management), माती परिक्षणानूसार (Soil Testing) रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परभणी येथील वसंराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खत व्यवस्थापनासाठी पुढील शिफारशी केल्या आहेतः

Fertilizer Application
ड्रीपद्वारे खते देण्याच्या पद्धती | Fertigation | ॲग्रोवन

पिकाच्या अन्नद्रव्याच्या एकूण गरजेपैकी अर्धी मात्रा रासायनिक खतामधून आणि उरलेली अर्धी मात्रा सेंद्रिय खतामधून भागविली जाते. म्हणून खत व्यवस्थापन करताना रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते आणि सेंद्रिय द्रव्ये यांचा योग्य प्रमाणात समतोल राखावा. याशिवाय पिकाच्या फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करावा. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवण्यास मदत होते.

Fertilizer Application
फळपिकासाठी जमीन अन खत व्यवस्थापन
 1. दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा. उदा. नायट्रोस्फॉस्फेट १५:१५:१५ (आमोनियंम फॉस्फेट २८: २८: ०).

 2. स्फुरदाची उपलब्धता सहज होण्यासाठी पूर्णपने विद्राव्य खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय आमोनिअम फॉस्फेट

 3. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करावा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, आमोनियम फॉस्फेट

 4. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जिवाणू खतांचा (पीएसबी) वापर करावा.

 5. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी निमकोटेड किंवा सल्फरकोटेड युरिया वापरावा.

 6. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्प किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

 7. साखर कारखान्यांतील उसाची मळी, जिवाणू खतांचा वापर करावा.

रासायनिक खतांचा वापर कसा करावा?

 • रासायनिक खतांचा वापर करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यातः

 • साधारणतः स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सेंमी खोल द्यावीत.

 • नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हप्त्यात न देता पिकाच्या अवस्था लक्षात घेऊन २ अथवा तीन हप्त्यात द्याव्यात.

 • चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.

 • नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.

 • पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com