आदर्श जवळचे असावेत

काही काही माणसं फक्त परदेशी उद्योजक, लेखक/कवी, नट, नट्या तसेच त्यांच्या कलाकृती यांच्याकडंच आदर्श म्हणून पाहतात. केवळ परदेशी कपडे किंवा वस्तू वापरून ते थांबत नाहीत तर आपल्या देशी उत्पादनांनाही कमी लेखत असतात.
आदर्श जवळचे असावेत

काही काही माणसं फक्त परदेशी उद्योजक, लेखक/कवी, नट, नट्या तसेच त्यांच्या कलाकृती (artwork) यांच्याकडंच आदर्श म्हणून पाहतात. केवळ परदेशी कपडे किंवा वस्तू वापरून ते थांबत नाहीत तर आपल्या देशी उत्पादनांनाही कमी लेखत असतात. तशीच परिस्थिती साहित्याच्या बाबतीतही दिसते. काही वाचक मराठी लेखकांचं साहित्य वाचत नाहीत.

आदर्श जवळचे असावेत
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

मात्र परदेशी लेखकांची मराठीत अनुवादित केलेली पुस्तकं मात्र आवर्जून वाचतात. अशी पुस्तकं स्टेट्स सिम्बॉल म्हणून घरात किंवा ऑफिसमध्येही ठेवताना अनेक जण अनेक ठिकाणी दिसतात. पण मला असं म्हणायचं आहे, की आपल्याला आपल्या देशातील सोडा पण आपल्या जवळचा एखादा यशस्वी माणूस कधी आदर्श का बरं वाटत नाही.

त्याच्याकडं पाहून आपणही तसे कष्ट करावेत, धैर्याचा ध्यास घ्यावा, मागे वळून न पाहता पुढं पावलं टाकत राहावीत, असं का बरं वाटत नाही? खरं तर असं वाटणं अन् त्यानुसार कृती करणं आपल्या यशात भर घालू शकते ना? मी मुद्दाम आपल्या जवळचे आदर्श का म्हणतोय त्याचं कारण असं आहे, की असे आपल्या जवळपास असलेले आदर्श यांना आपण जवळून ओळखत तर असतोच, परंतु त्यांचा जीवन संघर्ष आपल्या डोळ्यांनीही पाहिलेला असतो. तो संघर्ष कुठल्याही लेखकानं शब्दांनी रंगवून उभा केलेला नसतो. म्हणून तर अशी माणसं अस्सल वाटतात. प्रेरणादायी वाटतात.

आदर्श जवळचे असावेत
Crop Insurance : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’

त्यांच्याप्रमाणे जर आपण मार्गक्रमण करू लागलो अन् त्यात जर काही अडीअडचणी आल्या, तर त्यावर उपाय सुचवणारे हात आपल्याच जवळ असल्यानं आपल्याला त्यातून सहजासहजी बाहेरही पडता येऊ शकते. म्हणूनच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, की आपल्याच मातीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रात शून्यातून विश्‍व निर्माण केलेल्या उत्तुंग माणसांना आपण आदर्श मानून स्वतःचाही उत्कर्ष साधू या.

यामध्ये केवळ मोठा उद्योगधंदा उभारून हजारो जणांना नोकरी देणारा माणूसच आदर्श असू शकतो, असं नव्हे तर आपल्याच गावातली एखादी विधवा स्त्री जमीनजुमला नसतानाही स्वतःच्या लेकरांना मोलमजुरी करून शाळा शिकवून मोठं करत असेल, तर त्या खंबीर स्त्रीलासुद्धा आदर्श मानायला काय हरकत आहे?

अन्याय, अपमान, अपयश पचवून पुढं जात राहण्याची प्रचंड ताकद आपल्या इथल्याच मातीत आहे. त्यामुळे कुठल्याही संकटाला अजिबात न जुमानता त्याच्याशी दोन हात करून अडचणींच्या चिखलातली आपली गाडी वर काढून यशस्वी होण्यासाठी झटू या. आपणही मोठं होऊ या. आपली माणसंही मोठी करूया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com