Fertilizer Management : विद्राव्य खतांची ओळख अन् कार्ये

विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्यवेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पिकास फायदा होतो.
Fertilizer Management
Fertilizer Management Agrowon

पीक उत्पादनामधे संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनाला (Fertilizer Management) अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वरूपात, विविध प्रकारे खतांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून, पाण्यातून, विद्राव्य वरखते, (Soluble Fertilizer) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते असे अनेक खतांचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहिती नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते. अशावेळी पीक उत्पादन खर्चात वाढ होते तसेच पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घट संभवते. त्यासाठी विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्यवेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पिकास फायदा होतो.

Fertilizer Management
Organic Fertilizer : अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची...

१) १९:१९:१९ व २०:२०:२० ः
या खतांना ‘स्टार्टर ग्रेड’ असे म्हटले जाते. या खतांचा वापर प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी केला जातो.

२) ००:५२:३४ ः
- या खतास ‘मोनो पोटॅशिअम फॉस्फेट’ म्हणून ओळखले जाते.
- फुले लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या खताचा वापर केला जातो.
- यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
- फळपिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी तसेच आकर्षक रंगासाठी याचा वापर होतो.

३) १२:६१:००
- या खतास ‘मोनो अमोनिअम फॉस्फेट’ असे म्हणतात.
- नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी उपयुक्त असते. फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. यामुळे फुटवा चांगला येण्यासही मदत होते.

४) १३:४०:१३
कपाशीसारख्या पिकाचा पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. तसेच शेंगवर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढण्यास मदत होते.

५) १३:००:४५
- या खतास ‘पोटॅशिअम नायट्रेट’ म्हणतात. यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून, पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
- या खतास ‘पोटॅशिअम नायट्रेट’ असे म्हणतात.
- पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी हे खत उपयुक्त आहे.
- हे खत वनस्पतींमध्ये अन्न तयार करणे व त्याच्या वहनासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे फुलोऱ्यानंतरच्या किंवा परिपक्वतेच्या अवस्थेत या खताची आवश्यकता असते.

६) १२:३२:६१
- कायिक वाढ थांबवून फुलधारणा होण्यासाठी, फुलकळी जास्त येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी या खताचा उपयोग होतो.

७) २४:२४:००:८
- या खतामधील नत्र हे अमोनिकल व नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करता येतो.

८) ००:००:५०
- या खतास पोटॅशिअम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश’ असे म्हणतात.
- या खतामुळे पीक अवर्षण स्थितीतही तग धरू शकते.
- फळाचा आकार, रंग, वजन वाढवून गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी हे खत मदत करते.
- या खतामध्ये गंधक सल्फेट स्वरूपात उपलब्ध असल्याने भुरीसारख्या रोगाचे नियंत्रण चांगल्याप्रकारे होते.

९) कॅल्शिअम नायट्रेट ः
- या खताच्या वापरामुळे पिकाच्या मुळ्या जोमदार वाढून पीक काटक बनते. मुळांच्या वाढीसाठी या खताची आळवणी केल्यास चांगले परिणाम मिळतात.
- पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तसेच शेंगा किंवा फळ वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो.

- आकाश लेवाडे, ८३०८४ ८३७२६
(सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिंपरी, वर्धा
- आकाश वादाफळे,
(प्रक्षेत्र अधीक्षक, ग्रामीण कृषी विज्ञान संस्था, पिपरी, वर्धा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com