जगाला अन्नसाठा पुरवण्यास भारत तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; जो बायडेन यांच्याशी चर्चा
PM Modi and Joe Biden
PM Modi and Joe BidenAgrowon

गांधीनगर, गुजरात (वृत्तसंस्था) : एकीकडे अनेक देशांत महागाईचा भडका (Inflation erupts in the country) उडाल्याने अन्नधन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांमध्ये सध्या अन्नधान्याची टंचाई (Food scarcity) जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अन्नटंचाईच्या समस्येवर चर्चा केली. या वेळी त्यांनी जगाला अन्नसाठा पुरवण्यास भारत तयार असल्याचे बायडेन (Joe Biden) यांना सांगितले. जागतिक व्यापार संस्थेची मान्यता असल्यास भारत जगाला अन्नपुरवठा करू शकतो, असे मोदी यांनी सांगितले.

PM Modi and Joe Biden
सेंद्रीय अन्न निर्यात पालटेल भारतीय अर्थव्यवस्थेचं रुपडं

अदलज येथील अन्नपूर्णा धाम ट्रस्टच्या वसतिगृह आणि शैक्षणिक संकुलाचे उद्‍घाटन नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे केले. त्या वेळी ते बोलत होते. ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगातील अनेक भागांत सध्या अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. जगाला सध्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, जगातील अन्नसाठा संपत आला आहे. यासंदर्भात आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला.

जागतिक व्यापार संस्थेने (World Trade Organization) परवानगी दिल्यास भारत उद्यापासून जगाला अन्नसाठा पुरवण्यास तयार आहे', असे त्यांनी सांगितले. देशात पुरेसा अन्नसाठा असून, आमच्या शेतकऱ्यांनी जगाला अन्नपुरवठा करण्यासाठी व्यवस्था केली आहे. असे असले तरी जागतिकस्तरावरील कायद्यानुसार आपण कार्यवाही करू. त्यामुळे जागतिक व्यापार संस्था परवानगी कधी देणार आणि भारत जगाला अन्नसाठ्याचा पुरवठा कधी करू शकणार (When will India be able to supply food to the world?) हे माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास गरजेचा असल्याचे मोदी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com