लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण 'जीएम' तंत्रज्ञान

ब्राझीलकडून चाचण्यांना संमती; हजारो हेक्टर बीटी मक्यात प्रयोग
American Fall Army Worm
American Fall Army Worm Agrowon

पुणे ः जगभरातील मका उत्पादकांपुढे (Maize Farmer) अमेरिकन लष्करी अळीचे (fall Army Worm) महासंकट उभे आहे. त्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन ‘ऑक्सिटेक’ या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने या अळीचे जीएम नर पतंग विकसित केले आहेत. या तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीमुळे पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढावस्थेत जाण्यापासून रोखले जाऊन बाल्यावस्थेतच त्यांचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. (GM Technology For Fall Army worm Control)

सर्वांत मोठा मका उत्पादक (Maize Producer Country) देश अशी आंतरराष्ट्रीय ओळख असलेला ब्राझील या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसाठी संमती देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. २०२१-२२ च्या हंगामात हजारो एकर व्यावसायिक स्तरावरील बीटी मका पिकात त्याच्या पथदर्शी चाचण्या पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पाही शास्त्रज्ञांनी पूर्ण केला आहे.

अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) भारतातच नव्हे तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडातील शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे केले आहे. पिकातील आढळ व नुकसानीची पद्धती पाहता केवळ रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून किडीला नियंत्रणात ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे इंग्लंड स्थित ‘ऑक्सिटेक’ या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने नवा दृष्टिकोन (ॲप्रोच) असलेले तंत्रज्ञान जन्मास घालून या अळीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ‘सेल्फ लिमिटिंग जीन’चा (स्वमर्यादा जनुक) समावेश केलेले अमेरिकन लष्करी अळीचे जनुकीय सुधारित (जीएम) नर पतंग विकसित केले आहेत. या पतंगांवर आधारित पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढावस्थेत जाण्यापासून रोखले जाऊन बाल्यावस्थेतच त्यांचे नियंत्रण केले जाते.

ब्राझीलमध्ये चाचण्या

जागतिक स्तरावर सर्वांत मोठा मका उत्पादक अशी ओळख असलेला ब्राझील हा या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यासाठी संमती देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. देशातील हजारो एकर बीटी मका शेतांमध्ये २०२१-२२ च्या हंगामात पथदर्शी चाचण्या (पायलट) चाचण्या पूर्णही झाल्या आहेत. हा हंगाम आमच्यासाठी ‘लॅंडमार्क’ ठरणारा असून, शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया ऑक्सिटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रे फ्रॅंडसेन यांनी दिली आहे. ब्राझीलमधील मका उद्योग लष्करी अळीच्या वाढत्या धोक्याचा सामना करीत आहे. अशावेळी या उद्योगाचे परिवर्तन घडवून त्यास शाश्‍वती देण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठे पाऊल असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. तंत्रज्ञानाची परिणामकारकता व निष्कर्ष अभ्यासून हे तंत्रज्ञान अन्य देशांतील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा ऑक्सिटेकचा प्रयत्न आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com