Crop Insurance : अवकाळी पाऊस,गारपिटीच्या काळात विमा संरक्षण

गारपीट, हवामान धोक्यासाठी राज्य शासनाने विमा संरक्षण वेगळे दिले असल्याने शेतकऱ्यांना गारपिटीसाठी विमा हप्ता भरल्याची खात्री करून घ्यावी.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Rain Update : आंबिया बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी,प पई या पिकांसाठी आहे. यामध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना अवेळी पाऊस आणि गारपिटीपासून विमा नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

मात्र गारपीट, हवामान धोक्यासाठी राज्य शासनाने विमा संरक्षण वेगळे दिले असल्याने शेतकऱ्यांना गारपिटीसाठी विमा हप्ता भरल्याची खात्री करून घ्यावी.

घटना घडल्यापासून त्वरित ७२ तासांच्या आत आपल्या संबंधित विमा कंपनीस केंद्र शासनाचे पीकविमा ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक यापैकी एका माध्यमावर कळवावे.

त्याची पोहोच शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर येईल. जी पुढे विमा दावे स्थिती माहिती घेण्यासाठी उपयुक्त राहील.

फळपीक विमा योजनेत अवेळी पावसाबाबत जी प्रमाणके विमा योजनेत निश्‍चित केलेली आहेत, त्या कालावधीत आणि त्या हवामान धोक्यासाठी निर्धारित रकमेच्या मर्यादेत नुकसान भरपाई देय राहते.

Unseasonal Rain
Crop Damage : अवकाळीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान

अवेळी पाऊस आणि जास्त पाऊस या हवामान धोक्यांपासून संरक्षण

पीक हवामान धोके विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रिगर) संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर

संत्रा - अवेळी पाऊस १ डिसेंबर ते १५ जानेवारी सलग ७ दिवसात एकूण ३० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास २०,००० रु. २०,०००/-

मोसंबी - अवेळी पाऊस १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर सलग ४ दिवसात एकूण ३० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास १३,३०० रु. २६,६००/-

सलग ५ दिवसात एकूण ३५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास २१,३०० रु.

सलग ६ दिवसात एकूण ४० मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास २६,६०० रु.

डाळिंब - अवेळी पाऊस १५ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत १ दिवसात ५ मि.मी. पाऊस व आर्द्रता ७०% पेक्षा जास्त दोन्ही एकत्रित घडल्यास १९,५०० रु. नुकसान भरपाई देय ५२,०००/-

१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत १ दिवसात १५ मि.मी. पाऊस झाल्यास ३२,५०० रु. नुकसान भरपाई देय

काजू - अवेळी पाऊस १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी एका दिवसात ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास १३,००० रु. देय ६५,०००/-

सलग २ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास २६,००० रु. देय

सलग ३ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास ४५,५०० रु. देय

सलग ४ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास ६५,००० रु. देय

Unseasonal Rain
Pune Rain Update : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह हलक्या सरी

अवेळी पाऊस आणि जास्त पाऊस या हवामान धोक्यांपासून संरक्षण

पीक हवामान धोके विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रिगर) कमाल विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर

आंबा - कोकण विभाग अवेळी पाऊस १ डिसेंबर ते

३१ मार्च एका दिवसात ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ७,००० रु. १२६०० /-

सलग २ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये १२,६०० रु.

१ एप्रिल ते

१५ मे एका दिवसात १० मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ८,५०० रु. १५४००/-

सलग २ दिवस १० मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये १५,४०० रु.

आंबा गट क समाविष्ट जिल्हे पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा अवेळी पाऊस १ जानेवारी ते

३१ मे सलग ३ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ७,००० रु. ४२०००/-

सलग ४ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये २१,००० रु.

सलग ५ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ४२,००० रु.

आंबा - कोकण जिल्हे वगळून इतर जिल्हे अवेळी पाऊस १ जानेवारी ते

३१ मे सलग २ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ७,००० रु. ४२०००/-

सलग ३ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये २१,००० रु.

सलग ४ दिवस ५ मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रुपये ४२,००० रु.

टीप ः अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा. (लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी सहसंचालक तथा मुख्य सांखिक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com