Geranium Cultivation : सुगंधी व औषधी वनस्पती जिरॅनियम फायदेशिर आहे का?

जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी असते.
Geranium cultivation
Geranium cultivation Agrowon

बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पिके घेऊन शेती करतात. अन्य सुगंधी व औषधी पिके घेण्यास शेतकरी धजावत नाहीत, कारण त्यांना या पिकांची लागवड, त्यावरील प्रक्रिया, त्याची बाजारपेठ या गोष्टींची संपूर्ण माहिती नसते.

जिरॅनियम (Geranium) ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी असते. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे.

जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाची वर्षातून तीन वेळेस कापणी करता येते. व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. जिरॅनियम पाल्यापासून तेल काढतात.

Geranium cultivation
Geranium Oil Extraction : जिरॅनियम तेलकाढणीचे सुरू केले फिरते युनिट

साबण, सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम उद्योग क्षेत्रात जिरॅनियम वनस्पतीच्या तेलाला मागणी असते.

अनेक भागांत रानडुकरे व वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान होते. मात्र जिरॅनियम कोणताही प्राणी खात नाही.

मात्र, जमिनीचा प्रकार, त्यातून मिळणारे उत्पादन आणि त्यापासून निघणाऱ्या तेलाचा दर्जा या सर्व गोष्टींची माहिती घेऊनच जिरॅनियमची लागवड केली पाहिजे. 

जिरॅनियमचे तेल उग्र वासाचे आणि पिवळसर रंगाचे असते. तेलामध्ये जिरॅनिऑल व सिट्रोनलॉल हे प्रमुख घटक असतात. सर्व साधारणपणे हेक्टरी २५ ते ३० किलो तेल मिळते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते अत्तरात वापरले जाते.

जिरॅनियमची लागवड उन्हाळ्यात करतात. ठोंब किंवा कटिंगची लागवड गादिवाफ्यावर केली जाते. ७५ बाय ६० सेंमी अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी २५ हजार ठोंब लागतात. 

लागवडीनंतर ४ ते ६ महिन्यानंतर पहिली कापणी करता येते. १ ते २ वर्षात कापलेल्या ३० टन पाल्यापासून हेक्टरी २५ ते ३० किलो तेल मिळतं.

तर २ ते ४ वर्षात ३५ ते ४० टन पाल्यापासून ३० ते ३५ किलो तेल मिळतं.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com