Okra variety: भेंडीचे काशी चमन वाण उत्तर भारतात लोकप्रिय का?

उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत असलेल्या भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने काशी चमन हे भेंडीचे वाण विकसित केले आहे.
Okra Crop
Okra CropAgrowon

भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये भेंडीचे (Okra Production) उत्पादन घेतले जाते. भेंडीला बाजारात बारमाही मागणी असते. त्यामुळे भेंडी लागवड फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये जीवनसत्व सी आणि के भरपूर प्रमाणात असते. भेंडीमध्ये पॉलीफीनॉल असल्यामुळे ते ह्रदय आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे. तसेच भेंडीमधीळ लेक्टीन हे प्रथीन कर्करोगावर प्रतिबंधक म्हणून कार्य करते. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत असलेल्या भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने काशी चमन हे भेंडीचे वाण विकसित केले आहे.

Okra Crop
कोणत्या जमिनीत घ्यावं भेंडी पीक 

काशी चमन भेंडीची लागवड खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात करता येते. यलो व्हेन मोझॅक आणि चुरडा-मुरडा हे भेंडीवरील प्रमुख रोग आहेत. त्यांच्यामुळे भेंडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काशी चमन हे वाण यलो व्हेन मोझॅक आणि चुरडा-मुरडा या रोगांना प्रतिकारक आहे. भेंडीचे इतर वाण या रोगांना सहज बळी पडतात. तसेच इतर वाणांपेक्षा काशी चमन हे भेंडीचे वाण २१.६६ % अधिक उत्पादन देते. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा येथील शेतकऱ्यांमध्ये हे वाण अधिक लोकप्रिय झाले आहे.

Okra Crop
तंत्र भेंडी लागवडीचे...

काशी चमन भेंडीची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • या भेंडीचे झाड १२५ सेमी म्हणजे मध्यम उंचीचे असते. बिया लावल्यानंतर ३९ ते ४१ दिवसांत फुले येण्यास सुरुवात होते.

  • रंग गडद हिरवा असून फळांची लांबी ११ - १४ सेमी पर्यंत असते. ४५ ते ५० दिवसात फळधारणा होते. पुढे १०० दिवसांपर्यंत उत्पादन मिळते.

  • एक हेक्टर क्षेत्रातून १५० ते १६० क्विंटल उत्पादन मिळते.

  • उन्हाळी लागवडीसाठी हेक्टरी १४ किलो बियाणे पुरेसे होते आणि पावसाळ्यात हेक्टरी १० किलो बियाणे लागते.

  • उन्हाळ्यात ४५ बाय २० सेमी तर खरीपात ६० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी लागते.

  • शेणखताबरोबर १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पोटॅशची मात्रा द्यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com