
Poultry Farming : गवार (Cluster Bean) या शेंगावर्गीय पीकापासून गवार मील मिळते. गवार डिंक प्रक्रियेमधील गवार मील (Gaur Meal) हे उपउत्पादन आहे. यामध्ये प्रति किलोग्रॅम सुमारे ४९० ग्रॅम प्रथिने असतात.
उच्च प्रथिने असूनही, गवार मील हे कोंबडी खाद्यात व्यावसायिक स्तरावर फारसे वापरले जात नाही. परंतु पशुखाद्यामध्ये याचा वापर वाढला आहे.
गवारमध्ये ट्रिप्सिन इनहिबिटर हा मुख्य पोषक विरोधी घटक आहे, तथापि, एन्झाईम्सच्या वापराने तसेच उष्ण प्रक्रियेने यामध्ये सुधारणा होऊ शकते. जगभरातील झालेल्या संशोधन आधारे कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा समावेश करता येतो.
गवार मीलचे पोषण हे कोंबडीच्या वजनाच्या १०० ग्रॅम प्रती किलोपर्यंत प्रतिकूल आहाराशिवाय दिले जाऊ शकते. मात्र गवार मीलचे पोषण हे कोंबडी वजनाच्या १५० ग्रॅम प्रती किलोपर्यंत हे हानिकारक ठरू शकते.
कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा वापर फायदेशिर आहे का? याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
गवार मील मधील पोषक घटक
विविध अभ्यास आधारे असे दिसून आले आहे की गवार मील मध्ये आर्द्रता ७.९ टक्के आहे. प्रथिने ५१.७ टक्के, चरबी ५.३ टक्के, राख ५.२ टक्के आणि तंतूमय घटकाचे प्रमाण ५.९ टक्के आहे. गवार मीलमध्ये प्रथिने, राख आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे.
गवार मीलमध्ये कॅल्शियम १.१३ टक्के, मॅग्नेशियम २.४५ टक्के, पोटॅशियम ०.९२ टक्के, फॉस्फरस ३.१ टक्के, लोह ११० पीपीएम, जस्त ३६ पीपीएम आणि मॅंगनीज १६ पीपीएम आढळते. गवार मीलमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे.
कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा वापर
गवार मील एक उत्कृष्ट अत्यावश्यक अमिनो आम्लाचा स्रोत आहे. यामध्ये लाइसिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसीन व्हॅलिन आणि फेनिलॅलानिनची उच्च पातळी असते.
यातील अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबड्यांसाठी उपयुक्त प्रथिनांचा स्त्रोत आहे.
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोंबडी खाद्यामध्ये गवार मील २.५ टक्के आणि ५ टक्के प्रमाणात सामावेश केला असेल तर ब्रॉयलरच्या वाढीच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही. तथापि, उच्च समावेश पातळी (७.५ टक्के आणि १० टक्के ) ही वाढीच्या कामगिरीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.
गवार मील कोंबडी खाद्याचा चांगला घटक आहे. कारण यातील उच्च प्रथिने आणि उत्तम अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबडीच्या वाढीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.