Sweet Orange : मोसंबी बागा कीड आणि रोगमुक्त ठेवा

डॉ. दिलीप हिंगोले : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी
Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी आपल्या बागा कीड व रोगमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे (National Agricultural Research) वनस्पती रोग (Plant Disease) शास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले (Dr. Dilip Hingole) यांनी दिला.

Crop Damage
Crop Damage : खानदेशात वादळी पावसाने नुकसान

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या मोहिमेअंतर्गत सोमवारी (ता. ३) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील काही मोसंबी बागा शास्त्रज्ञांनी पहिल्या. महेश अशोकराव मडके यांच्या बागेत डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे डॉ. हिंगोले यांनी उपस्थित सर्वांच्या नजरेत आणून दिले.

Crop Damage
BSKKV Crop Advisory : कोकण सल्ला

डॉ. हिंगोले म्हणाले, की पैठण तालुका हा मोसंबीफळ बागेचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हे फळपीक कीड व रोगमुक्त ठेवण्यासाठी शेतकरी बांधवानी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आंबेबहरची फळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातून तोडणी झाली आहे.

Crop Damage
Crop Insurance : संत्रा पिकासाठी विमा योजना

त्यामुळे प्रथम बाग स्वच्छ ठेवत आणि खत व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पाहणीत काही बागेत डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. उपायाचा भाग म्हणून प्रथम हा आलेला डिंक जमिनीवर न पडता खरडून काढावे.

त्यानंतर या जागेवर सोडियम हायपोक्लोराईड किंवा मर्क्युरी क्लोराईड १ ग्रॅम १ लिटर पाण्यात घेऊन जखमेवर मलम या प्रमाणे लावावे. त्यानंतर दोन दिवसांनी बागेस बोर्डोपेस्ट लावावे, असे त्यांनी सूचविले. ज्या शेतकरी बांधवांना आपल्या बागेत अशी लक्षणे दिसून येतील त्या सर्वांनी सूचविल्याप्रमाणे उपाययोजना तत्काळ हाती घ्यावी,

असे आवाहन विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले. काही मोसंबी बागेचे सूक्ष्म निरीक्षण कृषी शास्रज्ञांनी केले. शास्त्रज्ञांच्या चमूत डॉ. पवार, डॉ. हिंगोले यांच्यासह डॉ. नितीन पतंगे, रामेश्वर ठोंबरे आदींचा समावेश होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com