Wheat Sowing : गहू पेरणी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा?

गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे.
Wheat Sowing
Wheat Sowing Agrowon

गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. गव्हाची पेरणी (Wheat Sowing) करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषय़ी  कृषी संशोधन केंद्र, निफाड येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

Wheat Sowing
Wheat Varieties : गहू लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड कराल?

बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. 

मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. 

एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास लागवड जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीत करावी. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० ते ७५ सें. मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमिनीची निवड करावी. 

Wheat Sowing
Wheat Rate : गव्हाचे दर पुन्हा वाढले

शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरावे.

संरक्षित पाण्याखालील पेरणी १ ते १० नोंव्हेंबरमध्ये करावी. बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे. या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. 

बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते.

बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील लागवडीसाठी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वापसा आल्यावर जमीन कुळवावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com