
राज्यातील अनेक विभागांमध्ये मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. यावर मात करून जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीची खते (Green Manuers) मोलाची ठरतात. हिरवळीची खत पिके ही जमिनीत हेक्टरी साधारणत: ६०-८० किलोपर्यंत नत्र स्थिरीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने करतात. मात्र काही ठिकाणी या हिरवळीच्या खतांचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. त्यामुळे हिरवळीच्या खताचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीची खतं व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.
हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढतं. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढत, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.
नुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावं.
कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.
हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकते.
ताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून, पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावं. हे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल वाढत असलं, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही. तसच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
हिरवळीच्या खताचा चांगला फायदा होण्यासाठी ती कोणत्याही जमिनीत वेगाने, भरपूर वाढणारी असावीत. पीक लवकर कुजणार रसरशीत व तंतूचं असावं. हिरवळीचं खत शक्यतो शेंगवर्गीय कुळातील मुळांवर जास्त गाठी असणारं असावं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.