Hydroponic Farming : जाणून घ्या हायड्रोपोनिक शेतीचे तंत्र

मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात.
Hydroponic Farming
Hydroponic FarmingAgrowon

वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत पिकाचे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे आहे. यामध्ये हायड्रोपोनिक शेती म्हणजेच माती विरहित शेती हा एक पर्याय उभा राहतो आहे. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक (Hydroponic) असे म्हणतात.  हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे कार्यरत म्हणजेच मातीविना शेती करणे. हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये वनस्पतीला मातीची गरज लागत नाही म्हणजेच मातीतून मिळणारे घटक जर पाण्यातून उपलब्ध करुन दिले तरी वनस्पती जगु शकते. हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय?, हायड्रोपोनिक तंत्राद्वारे (Hydroponic Farming) घेतली जाणारी पिके कोणती आहेत? याशिवाय या शेतीचे फायदे, प्रकार काय आहेत? याविषय़ी निम्स स्कूल ऑफ फुड ॲन्ड ॲग्रिकल्चरल इंजिनियरिंग, निम्स युनिव्हर्सिटी, जयपूर, राजस्थान येथील गणेश मोळावडे आणि बालाजी जाधव यांनी दिलेली माहिती पाहुया.

Hydroponic Farming
Wheat Cultivation : जाणून घ्या खपली गहू लागवडीचे तंत्र

हायड्रोपोनिक शेती 

हायड्रोपोनिक पद्धतीत पीव्हीसी पाईपमध्ये रोपांची लागवड केली जाते. पाईप ची लांबी- १९७ सेंमी, व्यास- १६ सेंमी आणि उतार- ४ अंश या प्रमाणात असतो. पाईपच्या 

वरील बाजूस छिद्र केले जाते आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात. पाईप पाणी वाहून नेते आणि रोपांची मुळे त्या पाण्यात बुडवलेली असतात. या पाण्यात रोपाला लागणारे सर्व पोषक घटक विरघळतात. हे तंत्र लहान वनस्पती असलेल्या पिकांसाठी उत्तम आहे. 

Hydroponic Farming
Poultry Diseases : कोंबड्यांतील रोग प्रसाराची कारणे जाणून घ्या | ॲग्रोवन

हायड्रोपोनिक तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके

यामध्ये जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी, लांब दाड्याची फुले इ. रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.

हायड्रोपोनिक शेतीचे फायदे 

- जवळपास ९० % पाण्याची बचत होते.

- एखाद्या ठिकाणी पाण्याची कमतरता जास्त असेल तर तेथे हायड्रोपोनिक शेती करणे शक्य आहे. 

- लहान आकाराची फळे किंवा भाजीपाला पिकवला तर खूप कमी जागेत भरपूर पिके घेता येतात. 

- केवळ १०० चौरस फुट जागेत २०० रोपे लावता येतील. त्याचबरोबर बाहेरील वातावरणातुन येणाऱ्या किडी पासुन पिकाला संरक्षण मिळते.

- परिणामी, वेळेची आणि मजुरांची बचत होते. 

- कमीत कमी जागेमध्ये नियंत्रित पद्धतीने व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे व फळांचे चांगले उत्पादन घेता येते. 

हायड्रोपोनिक शेती फायदेशीर आहे का?

१०० स्क्वेअर फुटामध्ये हायड्रोपोनिक यंत्रणा बसवायची असेल तर ५०-६० हजार रुपये खर्च येतो. या तंत्राद्वारे १०० चौरस फुटा मध्ये सुमारे २०० रोपे वाढवता येतात आणि कमी जागा असल्यास एक लहान हायड्रोपोनिक प्रणाली देखील सेट करता येते. हे तंत्रज्ञान प्रसिद्ध असल्या कारणांमुळे हायड्रोपोनिक सिस्टीम सोबतच मागणी नुसार विविध प्रकारचे हायड्रोपोनिक सिस्टीम ही उपलब्ध करून दिली जात आहेत. 

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानासाठी सुरूवातीला लागणारी आर्थिक गुंतवणूक जरी जास्त असली तरी कालांतराने त्यांचा मोबदला मिळत राहतो. हायड्रोपोनिक हे तंत्रज्ञान घरी भाज्या आणि फळे पिकवण्यासाठी सर्वोत्तम आहे. स्ट्रॉबेरी, लेट्युस सारखे सॅलड किंवा तत्सम जास्त नफा देणाऱ्या, कमी कालावधीच्या भाज्या पिकविल्या तर त्यामधुन नफा ही मिळू शकतो.

Hydroponic Farming
दुधातील भेसळीचे प्रकार | Milk Adulteration | ॲग्रोवन

हायड्रोपोनिकचे प्रकार 

१. ऍक्टिव्ह पद्धत

यामध्ये पाण्याचा साहाय्याने पिक घेतले जाते. पाण्याचे रिसायकलिंग (पाण्याच्या पुन्हा पुन्हा वापर) केले जाते. ऍक्टिव्ह पद्धती मध्ये जास्त काळजी घ्यावी लागत नाही. पाणी एकसमान वितरीत करण्यासाठी पंपाचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे जलद वाढ आणि उच्च उत्पन्नाचा फायदा मिळतो.

२. पॅसिव्ह पद्धत 

या पध्दतीत हायड्रोस्टोन व कोकोपीट चा वापर करून पिके घेतली जातात. कोकोपीट हे नारळाच्या केसरापासुन बनवतात. दोन्ही पद्धती मध्ये झाडाला आवश्यक घटक पुरवले जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com