Ravan Dahan : अहंकाररुपी रावणाचे करूया दहन

सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनीतीवर विजय झाला म्हणून या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
Ravan Dahan
Ravan DahanAgrowon

रावण हा अतिशय विद्वान आणि शक्तिशाली होता. परंतु रावणाला आपल्या ज्ञानाचा, साधनेचा अहंकार होता. अहंकारी रावण आपण किती श्रेष्ठ आहोत, (Ravan Dahan) हे जगाला ओरडून सांगत असे. आपले स्वामित्व सिद्ध करण्यासाठी असत्य बोलणे, अन्याय करणे, अनीतीच्या मार्गाचा अवलंब करणे असे अनेक दुर्गुण रावणाला चिकटले.

Ravan Dahan
Sugar Mill : सुधाकरपंत परिचारकांचे पांडुरंग कारखान्याला नाव

त्याचा नाश सत्यवचनी, न्यायी, नीतिमान अशा श्रीरामाने केला. सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनीतीवर विजय झाला म्हणून या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. रामायण महाभारतातल्या गोष्टी म्हणजे फक्त मनोरंजन नाहीत.

Ravan Dahan
Sugar Mill : माळेगाव कारखान्याने दिला ३,१०० रुपये अंतिम ऊसदर

आपल्या पूर्वजांपासून साजरे होत आलेले सण म्हणजे फक्त मौज मजा करण्यासाठी किंवा आपल्या संस्कृतीचा गर्व बाळगण्यासाठी नसून त्यातून काही सकारात्मक संदेश घेऊन आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी आहेत.

Ravan Dahan
Sugar Mill : नॅचरल उद्योग समूह पंधरा टक्के लाभांश

आपल्या समृद्धीच्या मार्गातला सर्वांत मोठा शत्रू म्हणजेच आपला अहंकार. विजयादशमीचा उत्सव हा सर्वांत आधी आपल्या अंतर्मनातला अहंकार रूपी रावण जाळून अगदी जल्लोषात व्हायला हवा. आपल्या संस्कृतीत स्त्रियांना दुर्गेचे रूप मानून गौरवलेले आहे.

Ravan Dahan
Sugar Mill : ‘संत तुकाराम’चा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न

स्त्रियांना बरोबरीची व सन्मानाची वागणूक द्यायला हवी. आधुनिक काळात स्त्रिया शिक्षित होऊन अधिकाधिक सक्षम होत आहेत. शहरातल्या महिला घर सांभाळून नोकरी करीत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना अगदी याच काळात खरिपाच्या काढणीचे अतिशय धावपळीचे काम असते.

Ravan Dahan
Sugar Mill : अडीच वर्षात ‘वारणा’ कर्जमुक्त करणार : डॉ. कोरे

त्यातच या कष्टकरी महिला नवरात्रीचे निरंकार उपवास करतात. खरे तर कामाच्या दिवसात या महिलांनी पोषक आहार घेतला पाहिजे. विजयादशमीच्या दिवशी देवी दुर्गेने अन्याय, अत्याचार करणाऱ्या महिषासुराचा वध केला. शक्तिशाली देवी दुर्गेचे रूप असणाऱ्या महिला नऊ दिवस उपवास करून विजयादशमी साजरी करतात.

विजयादशमीच्या सणाला प्रत्येक स्त्री ने स्वतःला सुदृढ आणि सक्षम करण्याचा संकल्प करायला हवा. हातातोंडाशी गाठ पडण्यासाठी सध्याचे दैनंदिन जीवन इतके युद्ध सदृश झाले आहे की जगण्याच्या लढाईत प्रत्येकाला संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही.

महाभारतातल्या कथेनुसार वनवास संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या झाडाखाली लपवलेली शस्त्रे काढली व त्यांचे पूजन केले व ते न्याय मिळविण्यासाठी शस्त्र सज्ज झाले. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या शस्त्रांचे दसऱ्याच्या दिवशी आपण पूजन करतो.

त्यायोगे त्या साधनांची निगा आणि देखभाल करणे हे खरे पूजन आहे. तन मन सुदृढ करण्याचा दृढनिश्चय करून नकारात्मक गुणांवर मिळवलेला विजय आणि नवीन संकल्पासाठी केलेले सीमोल्लंघन हेच खरे विजयादशमीचे फलित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com