लिंबूवर्गीय बागा वाचविण्यासाठी सिट्रस ग्रिनिंग रोगाचे व्यवस्थापन

सिट्रस ग्रिनिंग हा लिंबूवर्गीय (Citrus greening is citrus) फळझाडांमधील एक महत्त्वाचा रोग असून, अनेक राज्यांमध्ये उत्पादनावर (product) मोठा परिणाम करतो.
Citrus orchard
Citrus orchardAgrowon

संत्रा सल्ला

दिलीप घोष, डॉ. ए. के. दास

सिट्रस ग्रिनिंग हा लिंबूवर्गीय (Citrus greening is citrus) फळझाडांमधील एक महत्त्वाचा रोग असून, अनेक राज्यांमध्ये उत्पादनावर (product) मोठा परिणाम करतो. हा रोग जवळ जवळ सर्व जातींच्या लिंबूवर्गीय फळझाडे संक्रमित करतो. या रोगामुळे जागतिक स्तरावरही ६० दशलक्षाहून अधिक झाडे नष्ट झाली आहेत. या रोगाचा प्रसार आशियायी, आफ्रिकन, दक्षिण आणि उत्तर अमेरिकन अशा ४० भिन्न देशांमध्ये झालेला आहे. मागील दशकात अमेरिकेमध्ये ग्रिनिंगमुळे संत्रा उत्पादनामध्ये ७२ टक्के घट झालेली आहे. भारतात या रोगाची नोंद १९६० च्या दशकात प्रथम झाली. या रोगामुळे लिंबूवर्गीय फळझाडे (Citrus fruit trees) कमजोर होतात. फांदीमर व ऱ्हास होते. लिंबूवर्गीय झाडांमध्ये जिवाणूंचा शिरकाव झाल्यानंतर, झाड जिवंत असेपर्यंत जिवाणू त्यात सक्रिय राहतो. या गंभीर रोगावर (disease) नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी कोणतेही रसायन उपलब्ध नाही आहेत.

Citrus orchard
लिंबूवर्गीय पिकावरील तेलकट चट्टे

रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागांसाठी विशिष्ट नसतात. बऱ्याच वेळेस सिट्रस ग्रिनिंग रोगग्रस्त झाड आणि जस्त किंवा लोह यासारख्या खनिजांच्या कमतरतेची लक्षणे सारखीच दिसतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचा (Farmer) गोंधळ उडतो.
१) पिवळ्या कोंबाचा उदय हे सिट्रस ग्रिनिंग होण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. म्हणून या रोगाचे दुसरे नाव ‘हाँगलॉन्गबिंग’(एचएलबी) असे सुद्धा आहे.
२) पानांवर डाग पडणे हेही (विशेषतः मोसंबी फळांवरील या रोगाचे (disease on citrus fruits) सर्वोत्तम निदान लक्षण आहे.
३) रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानाचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो.
४) फांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात.
५) रोगग्रस्त फळे आकाराने लहान, कुरूप, चवीला कडू व निम्न दर्जाची असतात. अशी फळे, बीजविरहित असतात.

रोगकारक घटक :
- ग्रिनिंग हा रोग कॅन्डीडेंट्‍स लिबेरीबॅक्टर एशियाटीकस या असंवर्धित जिवाणूंमुळे उद्‍भवतो.
- हा जिवाणू झाडातील अन्नपुरवठा (Bacterial plant food supply) करणाऱ्या उतींमध्ये राहतो.
-नवीन कलम तयार करताना हा रोग संसर्गग्रस्त अशा कांडीपासून पसरतो.
-बागेमध्ये असणाऱ्या सिट्रस सायला (शा. नाव ः डायफोरिना सिट्री) या किडीमुळे या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे फळांचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते.

सिट्रस ग्रिनिंग रोगावर उपलब्ध सर्वोत्तम उपाययोजनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
१) रोगमुक्त लागवड 9Disease free planting) सामग्रीची खात्री करणे.
२) रोगाचा प्रसार करणाऱ्या सिट्रस सायलाचे नियंत्रण.
३) पोषक घटकांचा संतुलित व योग्य प्रमाणात वापर.
४) योग्य पाणी व्यवस्थापन.

यशस्वी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ः
१) रोपवाटिका ः (Nursery)
-रोपवाटिकेमध्ये रोगमुक्त वातावरणामध्ये रोपे व कलमांच्या निर्मितीकडे लक्ष देणे.
-कलम कांडीचे (बडवुड) रोगमुक्ततेसाठी प्रमाणीकरण राबवणे.
-मातृवृक्षांची निवड करण्यापूर्वीच रोगांच्या प्रादुर्भावाचे निदान करून केवळ रोगमुक्त मातृवृक्षापासूनच कलम कांडी निवडणे.
-संक्रमित बडवुड किंवा रोपवाटिकांच्या (nursery) साठ्याची हालचाल, विक्री आणि वापर मर्यादित करण्यासाठी नियामक (विलगीकरणाचे) उपाय करणे.
-रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नोंदणीकृत रोगमुक्त प्रमाणीकरण योजनेद्वारे रोपवाटिकांवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे.

Citrus orchard
आषाढीनिमित्त वारकऱ्यांनी प्रत्येकी एक रोप लावावे ः सयाजी शिंदे

२) एकात्मिक उपाययोजना (Integrated measures)

-टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड* ६०० पीपीएम (६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणाची हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात) ४५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. झिंक सल्फेट व फेरस सल्फेट (२०० ग्रॅम प्रत्येकी) झाडाच्या आळ्यामध्ये दोन वेळा विभागून वापरावे.
-रोगाचा प्रसार (spread of the disease) करणाऱ्या एशियन सिट्रस सायला या किडीच्या सक्रिय काळात (विशेषतः नवतीचा हंगाम) थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून करावी.
-रोगाची लक्षणे दिसणाऱ्या फांद्याची छाटणी करावी. यामुळे जिवाणूंची वाढ व साठा टाळता येतो. या जिवाणूची हालचाल संसर्ग झालेल्या झाडांमध्ये फार संथ गतीने होते. त्यामुळे एखाद्या फांदीमध्ये लक्षणे दिसतात, तेवढीच फांदी त्वरित कापून विल्हेवाट लावावी. जास्त प्रमाणात (म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त) संसर्ग झालेली झाडे (Tree) मुळासकट उपटून जाळून टाकावीत. सायला किडींची संख्या कमी असल्यास झाडाची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या नष्ट कराव्यात. अन्यथा, या रोगाचा प्रसार प्रादुर्भावित झाडे व सायला कीड या दोहोंच्या माध्यमातून वेगाने होऊ शकतो.

- दर छाटणीवेळी छाटणीची साधने (सिकेटर) १-२ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट द्रावणाने निर्जंतुक करावेत.
-गोंड लिंबाचे झाड (Gond lemon tree) हे सिट्रस सायला किडीचे पर्यायी खाद्य (होस्ट) आहे. त्यामुळे बागेच्या परिसरात किंवा आजूबाजूला गोडलिंबाची झाडे लावू नये.
-झाडांच्या आरोग्यासाठी (Tree Health) आणि फळबागांचे (Orchard) आयुष्य वाढवण्यासाठी शिफारशीत प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा द्याव्यात.

महत्त्वाचे
सिट्रस ग्रिनिंग रोगासाठी कारणीभूत जिवाणूंचे नियंत्रण करणे अवघड आहे. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाड उपटून व्यवस्थित नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे. या रोगावर उपाय शोधण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन (Citrus fruit research) संस्थेचे अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम सुरू आहे. अँटी-मायक्रोबियल पेप्टाइड्स, नॅनो-झिंक ऑक्साइड, क्रिस्पर दृष्टिकोन, रोग प्रतिरोधक ट्रान्सजेनिक वनस्पती विकसित करणे इ. नवीन तंत्रज्ञानावर संशोधन व अभ्यास सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com