Poultry Farming : अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे व्यवस्थापन

अंड्यातून मिळणारा नफा कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. अंडी देण्याचे प्रमाण जितके जास्त तितका अधिक नफा मिळतो, त्यामुळे कोंबडीपालनासाठी जास्त प्रमाणात अंडी देण्याच्या कोंबड्या ठेवणे फायदेशीर ठरते. कोंबड्या जेव्हा अंड्यावरती येतात तेव्हा तुर्रा आणि गलोल यांना रक्ताचा पुरवठा जास्त होतो.
Poultry Farm
Poultry FarmAgrowon

डॉ. कल्याणी सरप, डॉ. सय्यद शाकिर अली

अंड्यातून मिळणारा नफा कोंबड्यांच्या अंडी (Poultry Farming) देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. अंडी देण्याचे प्रमाण जितके जास्त तितका अधिक नफा मिळतो, त्यामुळे कोंबडीपालनासाठी (Poultry Farm) जास्त प्रमाणात अंडी देण्याच्या कोंबड्या ठेवणे फायदेशीर ठरते. कोंबड्या जेव्हा अंड्यावरती येतात तेव्हा तुर्रा आणि गलोल यांना रक्ताचा पुरवठा जास्त होतो.

Poultry Farm
Poultry Farm Agriculture Allied व्यवसाय समजावा | Poultry Tax | Agrowon

या रक्त पुरवठ्यामुळे तुर्रा व गलोल यांची वाढ होते. त्यांचा आकार मोठा होऊन हात लावल्यास तो गरम लागतो. तुर्रा आणि गलोल लाल व तजेलदार दिसतो. याउलट अंडी देण्याचे थांबल्यावर या अवयांना रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे आकुंचन पावून ते निस्तेज दिसतात. त्यांच्यावर पांढरी भुकटी जमा होते. हात लावल्यास ते अवयव गार लागतात.

कोंबडी अंड्यावरती आल्यावर अंडे सहज रीतीने बाहेर निघावे यासाठी गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या हाडामधील अंतर वाढते. जसेजसे अंडी देण्याचे प्रमाण वाढते तसतसे या हाडामधील असलेली चरबी कमी होत जाऊन हाडाची टोके स्पष्टपणे हाताला लागतात.कोंबड्यांनी अंडी देणे सुरू केल्यावर त्याची भूक वाढते. त्यामुळे त्यांना जास्त खाद्य लागते. जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांची पाठ रुंद असते. त्याचप्रमाणे छातीची खोली भरपूर असते.

मोकळ्या सोडलेल्या अंडी देणाऱ्या कोंबड्या दिवसभर लिटर पायाने उकरून त्यात काही खाद्य मिळते का ते पाहण्यात दंग असतात. यामुळे पायांची व नखांची झिज होऊन ती लहान व बोथट झालेली दिसतात. याउलट कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या आराम करताना आढळतात. त्यांची चोच लांब व अणकुचीदार असते. पायांची नखे मोठी आणि तीक्ष्ण आढळतात.

ज्या कोंबड्या लवकर वयात येतात त्यांचे अंडी उत्पादन जास्त असते. जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांची पिसे विस्कटलेली असतात, तुटलेले व भुरकट दिसतात. याउलट कमी अंडी देणाऱ्या कोंबड्यांची पिसे तुकतुकीत व चांगली दिसतात.

Poultry Farm
Poultry Farming : कोंबडीपालनाने दिली बचत गटाला साथ

कोंबड्यांचे व्यवस्थापन

कोंबड्या अंड्यावर आल्यावर त्यांना शक्यतोवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये. त्याचप्रमाणे त्यांच्या खाद्यात फारसा बदल करू नये. असा बदल झाल्यास कोंबड्यांच्या डोक्यावरील आणि मानेवरील पिसे गळण्यास सुरुवात होते. अंडी उत्पादन काही दिवसांकरिता बंद होते.

कोंबड्यांना समतोल व भरपूर खाद्य मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी खाद्य आणि पिण्याच्या भांड्यांवर गर्दी होणार नाही, सर्वांना खाद्य व पाणी भरपूर मिळणे हे पाहावे. खाद्याबरोबर स्वच्छ व ताजे पाणी मिळणे आवश्यक आहे. एक दिवस जरी पाण्याच्या पुरवठा अपुरा झाल्यास अंड्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. उन्हाळ्यात कोंबड्यांना मातीच्या भांड्यातून पाणी द्यावे.

Poultry Farm
Poultry Farm : करारावरील पोल्ट्रीकरिता नियमावली निश्चित करा

आकस्मित होणारा कोणताही बदल, अस्वच्छ वातावरण, कृमी कीटकांचा प्रभाव या गोष्टींचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो. कोंबड्या अंड्यावर आल्यावर प्रकाशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढवत राहावे, कमी करू नये. कमी झाल्यास अंडी उत्पादनावर परिणाम होतो.

जानेवारीच्या अखेरीस एका दिवसाची पिल्ले विकत घेतल्यास पाच महिन्यांनी म्हणजे जूनच्या शेवटी त्या अंड्यावर येतील. जूनच्या शेवटच्या आठवड्यातील दिवस सर्वात मोठे असतात. त्यानंतर दिवस हळूहळू लहान होत जाऊन डिसेंबरच्या शेवटी सर्वांत लहान होतात. यासाठी कोंबड्यांना कृत्रिम प्रकाश द्यावा म्हणजे अंड्याचे उत्पादन जास्त मिळेल व त्यापासून आर्थिक लाभ अधिक होईल.

जिथे वीज उपलब्ध असेल तिथे सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्यास्तानंतर कृत्रिम प्रकाश मिळून २४ तासांचा दिवस करावा. डिसेंबर अखेर पर्यंत १८ तासांचा करावा म्हणजे जूनअखेरपासून डिसेंबरअखेरपर्यंत २४ आठवड्यात कृत्रिम प्रकाश ४ तासांनी वाढवावा. यासाठी शेवटी १४ तासांचा दिवस करून दर आठवड्यात १० मिनिटांनी दिवस कृत्रिम रीतीने वाढवत जावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com